Search This Blog

Monday, 11 September 2023

सोयाबीन पिकावरील उंट अळीचे व्यवस्थापन

 


सोयाबीन पिकावरील उंट अळीचे व्यवस्थापन

चंद्रपूर,दि.11: यावर्षी जिल्ह्यात 66,931 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी भद्रावती  क्षेत्रामध्ये काही प्रमाणात सोयाबीन पिकावर उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

निरीक्षण व क्षेत्रीय भेट :

हिरवी उंटअळी:-प्रक्षेत्र भेट  दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी मौजापिरली येथील शेतकरी भाऊराव बोंडे यांच्या शेतावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावारसिंदेवाही,कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विनोद नागदेवतेवरोराचे उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषि अधिकारी सुशांत लव्हटेतालुका कृषि अधिकारी मोहिनी जाधव यांनी भेट दिली. सोयाबीन पिकाची पाहणी केली असता सोयाबीन पिकावर काही प्रमाणात उंटअळीचा प्रादुर्भाव दिसुन आला. उंटअळी प्रथम पानाचा हिरवा भाग खरडून खतात तर मोठया अळया पानाचा सर्व भाग खाऊन टाकतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात आणि अळया फुलांचे व शेंगाचे नुकसान करतात  

अळीचे व्यवस्थापन:

सोयाबीन पिकामध्ये सर्वेक्षणासाठी एकरी 4 फेरोमन सापळे लावावेपिकांचे सर्वेक्षण करून आर्थिक नुकसानीची पातळी 4 लहान अळ्या प्रति मिटर ओळीत आढळल्यास लेबल क्लेम शिफारसीत प्रोफेनोफॉस 50 .सी. 20 मि.लीकिंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 .सी. 3 मि.लीकिंवा इन्डोक्सीकार्ब 15.8 .सी. 6.6 मि.लीकिंवा थायमिथोक्झाम 12.6 + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के 2.5 मि.लीकिंवा फ्लुबेनडायअमाईड 39.35 टक्के एम/एम एस सी मि.ली फल्यु बेंडामाईट 20 20 डब्ल्यु.जी. 5-6 ग्रॅम किंवा इमामेक्टीन बेंजोएट 1.9 .सी0 8.5 मि.लीकिंवा नोव्हॅल्युरीन 6.25 टक्के इंडोक्झाकार्ब 4.5 टक्के एस.सी. 17.5 मि.लीकिंवा  क्लोरॅनट्रानिप्रोल 9.30 टक्के लॅम्बडा सेयहेलोथ्रिन 4.60 टक्के 4. मि.लीप्रति 10 लिटर पाण्यात मिसळून याप्रमाणे कोणतेही एक कीटकनाशक फवारणी साठी वापरावे. शेतकरी बांधवानी शेतामध्ये सर्वेक्षण करून सोयाबीन पिकावर उंटअळीचा प्रादुर्भाव नियंत्रीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अधिक माहितीसाठी कृषी सहायककृषि पर्यवेक्षकमंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment