Search This Blog

Monday, 25 September 2023

जिल्ह्यातील 211 मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे व पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त


जिल्ह्यातील 211 मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे व पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त

Ø मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना सूचना करण्याची अंतिम मुदत 28 सप्टेंबरपर्यंत

चंद्रपूरदि. 25 : विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (अहर्ता दिनांक 1 जानेवारी 2024 वर आधारित) अंतर्गत मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या एकूण 2032 यादी भागांमध्ये राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्व पुनरिक्षण उपक्रमाचा एक भाग भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 पर्यंत सर्व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत गृहभेटीचा उपक्रम राबविण्यात आला आहे. तसेच 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना देखील करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकत्रितरित्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे 137 प्रस्तावमतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे 54 प्रस्तावविलीन (मर्ज) करण्यात आलेले मतदान केंद्र 9 प्रस्ताव तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका मतदान केंद्रावरील 1500 मतदारांपेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्रांच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणारे 11 मतदान केंद्र असे एकूण 211 मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाचे व पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहे.

सदर प्रस्तावित बदल हे सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारीचंद्रपूर या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. सदर प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडून मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य) यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोग यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. बदल करण्यात आलेल्या व अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर जाहीररित्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना सूचना द्यावयाची असल्यास 28 सप्टेंबर 2023 पर्यंत सदर सूचना जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारीचंद्रपूर यांच्या कार्यालयास देऊ शकतील.

छायाचित्र मतदार यादीच्या पुनरिक्षण कार्यक्रमाचे अनुषंगाने 17 ऑक्टोबर 2023 रोजी एकत्रितरित्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वरील नमूद बदलाचे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडून मंजूर झाल्यास एकत्रितरित्या प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये सदरचे बदल अंमलात येतील व त्या आधारे मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना देखील अस्तित्वात येईल. याबाबतची जाहीर नोटीस 21 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारीचंद्रपूर यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment