जिल्हा माहिती कार्यालयातील वृत्तपत्रांची रद्दी विक्री
Ø 15 सप्टेंबरपर्यंत दरपत्रक सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि.08: जिल्हा माहिती अधिकारी यांचे कार्यालय, चंद्रपूर येथील दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्राची रद्दी विक्री करावयाची आहे. त्यासाठी स्थानिक अधिकृत परवानाधारक रद्दी खरेदीदाराकडून/ दुकानदारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहे. त्यासाठी खरेदीबाबतचे दरपत्रक (निविदा) जिल्हा माहिती अधिकारी यांचे कार्यालय, खोली क्र. 20, पहिला माळा, प्रशासकीय भवन, चंद्रपूर यांचे नांवे सीलबंद पाकिटात दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचतील या बेताने पाठवावीत. पाकिटावर रद्दी विक्रीसाठी दरपत्रक असे ठळक अक्षरात नमुद करावे.
प्राप्त झालेले दरपत्रक (निविदा) त्याचदिवशी दुपारी 3.00 वाजता उघडण्यात येईल. निविदा उघडतांना स्वत: किंवा प्रतिनिधी उपस्थित राहावे. रद्दी विक्रीबाबतचे दरपत्रक (निविदा) मंजूर करण्याचे अथवा रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर यांनी राखून ठेवले आहे. रद्दी विक्री, कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा माहिती अधिकारी यांचे कार्यालय, रुम नं 20, पहिला माळा, प्रशासकीय भवन, चंद्रपूर येथे संबंधितांना पाहता येईल. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
00000
No comments:
Post a Comment