फुटबॉल चाचणीच्या माध्यमातून
दिल्ली येथे खेळण्याची सूवर्णसंधी
Ø 17 वर्षांखालील खेळाडूंनी
भाग घेण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 15
: देशात फुटबॉल खेळाचा प्रसार व प्रचार करण्याकरिता अग्रेसर असलेली ‘इंडिया खेलो
फुटबॉल’ या संस्थेमार्फत मागील वर्षीपासून चंद्रपूर जिल्ह्याची निवड करण्यात आली
आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या
संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रतिभावान आणि फुटबॉल खेळाडूचा शोध घेऊन त्यांना
फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 17 वर्षांखालील जिल्ह्याची उत्कृष्ट टीम
निवडून तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याकरीता जिल्हा क्रीडा संकुलातील फुटबॉल
क्रीडांगणावर या टीमला प्रशिक्षित करण्यात येईल. त्यानंतर दिल्ली येथे आयोजित
होणाऱ्या फुटबॉल लीगच्या सामन्यांकरिता निवड चाचणीसाठी सदर टीम दिल्ली येथे
पाठविण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाकरीता
जिल्ह्यातील 15 तालुक्यातून 17 वर्षातील फुटबॉल खेळाडूंची निवड करून या निवड
चाचण्यांचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुलातील अद्यावत फुटबॉल मैदानावर करण्यात येणार
आहे. या चाचण्यांच्या आयोजनाकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पुढाकार घेऊन
नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास 5 लक्ष रुपयांची तरतूद
उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील प्रतिभावान फुटबॉल खेळाडू निवडण्यासाठी क्रीडा
चाचण्यांचे आयोजन व नियोजन ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हा क्रीडा
संकुलातील फुटबॉल क्रीडांगणावर घेण्यात येणार आहे.
फुटबॉल खेळाडूंकरीता
ही सुवर्णसंधी असल्याने याचा लाभ जिल्ह्यातील सर्व 17 वर्षातील फुटबॉलपटूंनी
घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. तसेच
चाचण्यांचे योग्य नियोजन व खेळाडूंची निवड प्रक्रिया उत्तम व्हावी, याकरिता जिल्हा
क्रीडा अधिकारी प्रयत्न करीत असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी
कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment