Search This Blog

Friday, 1 September 2023

शेतकरी आत्महत्येची 17 प्रकरणे मदतीकरीता निकाली


 

शेतकरी आत्महत्येची 17 प्रकरणे मदतीकरीता निकाली

Ø    अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला आढावा

चंद्रपूरदि. 1 : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये  शेतकरी  आत्महत्येची एकूण 31 प्रकरणे समितीपुढे ठेवण्यात आली. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत 17 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 11 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहेतर उर्वरित 3 प्रकरणे फेरचौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारनायब तहसिलदार गिता उत्तरवारकृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरेजिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत धोंगडेपोलिस उपनिरीक्षक दौलत इष्टामनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद किन्नाकेकृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूतजिल्हा उपनिबधंक कार्यालयाचे अधिक्षक धनराज नंदनवार,  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी शंकर लोडेमहसूल सहाय्यक प्रमोद गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतीमध्ये सततची नापिकीकर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येते.

०००००००

No comments:

Post a Comment