पवित्र पोर्टलवर शिक्षणसेवक/शिक्षक पदभरतीकरीता स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
चंद्रपूर,
दि. 18 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था
व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षणसेवक/ शिक्षक
पदभरतीसाठी शासनाने ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022’ हि परीक्षा दि. 22 फेब्रुवारी ते 3 मार्च
2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती.
चाचणी दिलेल्या उमेदवारांना दि. 1 ते
15 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर सुविधा
उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, राज्यातील काही भागांमध्ये इंटरनेट
सुविधा व्यवस्थितरित्या
सुरू नसल्यामुळे तसेच दि. 14 सप्टेंबर रोजी पोर्टल स्व-प्रमाणपत्र
पूर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता दिलेल्या मुदतीत पूर्ण होणार नाही,
ही बाब विचारात घेऊन स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दि. 22 सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे.
या चाचणीस एकूण 2 लक्ष 39 हजार 730 उमेदवारांनी
नोंदणी केली होती. त्यापैकी, 2 लक्ष 16 हजार 443 उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली. प्रमाणीकरण करीत असतांना अथवा पोर्टल संदर्भात इतर
कोणतीही शंका असल्यास किंवा अडचणी येत असल्यास edupavitra2022@gmail.com या ई-मेलवर
आपला अर्ज पाठवावा. त्यावर यथाशीघ्र उत्तर देण्यात येईल. यासाठी कोणताही कर्मचारी,
अधिकारी अथवा त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क करू नये.
नमूद कालावधीत जे उमेदवार स्व-प्रमाणपत्र
पूर्ण करणार नाही ते उमेदवार नव्याने होणाऱ्या शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीच्या पुढील
प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाही. ‘शिक्षक अभियोग्यता
व बुद्धिमत्ता चाचणी-2022’ ही चाचणी दिलेल्या उमेदवारांनी
https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन 22 सप्टेंबर
2023 अखेरपर्यंत आपली कार्यवाही पूर्ण करावी, असे शिक्षण विभागाने कळविले आहे.
No comments:
Post a Comment