Search This Blog

Thursday, 7 September 2023

मनरेगा अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकाऱ्याची नियुक्ती

मनरेगा अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकाऱ्याची नियुक्ती

चंद्रपूर,दि. 7 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करतांना सर्वसाधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरीता मनरेगा अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 ऑगस्ट 2023 च्या शासन निर्णयान्वये, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर पुंडलिकराव सपाटे यांची जिल्हाधिकारी कार्यालय, रोहयो शाखेत तक्रार निवारण प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मनरेगा संदर्भात कोणत्याही तक्रारी असल्यास तक्रार निवारण प्राधिकारी यांच्या नावाने तक्रार दाखल करावी. जिल्ह्यातील नागरीकांनी याबाबत नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) अजय चरडे यांनी कळविले आहे.

००००

No comments:

Post a Comment