रेती घाटांच्या निविदेच्या अनुषंगाने
अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन
चंद्रपूर,
दि. 15 :
सन 2023-24 या वर्षाकरीता जिल्ह्यातील वाळूगटाच्या राज्यस्तरीय (SEAC व SEIAA) पर्यावरण
समितीची अनुमती मिळण्याकरीता अर्ज सादर करावयाचे आहे. त्याकरीता जिल्ह्यातील
वाळूगट निश्चित करण्यात आले असून उपलब्ध संसाधनाच्या आधारे जिल्हा सर्वेक्षण अहवाल
तयार करण्यात आला आहे.
केंद्र
शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाने जानेवारी 2022 मध्ये प्रसिद्ध
केलेल्या वाळू/रेती उत्खनन मार्गदर्शक सूचनेनुसार सदर अहवाल जनतेच्या माहितीकरीता
व अभिप्राय नोंदविण्याकरीता http://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून
देण्यात आला आहे. सदर अहवालातील रेती घाटांच्या निविदेच्या अनुषंगाने अभिप्राय
उपरोक्त संकेतस्थळावर नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment