आता ग्रामपंचायत स्तरावर प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
Ø युवकांना ग्रामपंचायत कार्यालयात नोंद करण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 28 : कौशल्य विकास उपक्रमांचा लाभ ग्रामीण भागातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा व युवकांना स्थानिक ठिकाणी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त होऊन ग्रामीण भागातील युवकांचे स्थलांतरण कमी व्हावे, या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री यांच्या निर्देशानुसार, ग्रामीण भागात कौशल्य विकास केंद्र सुरू करावयाचे आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल.
यादृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतीमध्ये बल्लारपूर तालुक्यातील कोठारी, भद्रावती-चंदनखेडा, ब्रह्मपुरी-गांगलवाडी, चंद्रपूर-मोरवा, चिमूर-नेरी, गोंडपिपरी-भंगाराम तळोधी, जिवती-शेणगाव, कोरपना-नांदा, मुल-राजोली, नागभीड-तळोधी बाळापुर, पोंभुर्णा-देवाडा(खु.), राजुरा-विरुर, सावली-व्याहाड खुर्द, सिंदेवाही-नवरगाव तसेच वरोरा-शेगांव येथे कौशल्य विकास केंद्र स्थापित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सदर ग्रामपंचायत भागातील युवकांना कौशल्य विकास केंद्रामार्फत रोजगार व स्वयंरोजगाच्या संधी प्राप्त करून घेण्याकरीता ग्रामपंचायत कार्यालयात नोंद करावी, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment