Search This Blog

Wednesday 31 July 2024

आदिवासी लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करा - जतोथु हुसेन



 

आदिवासी लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करा - जतोथु  हुसेन

चंद्रपूरदि.31 : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यात आला आहे. वैयक्तिक कुटुंबाला लाभ होईल, अशा योजना जास्तीत जास्त प्रमाणात देणे आवश्यक आहे. आपण सर्वजण जनतेचे सेवक आहोत, त्यांच्या सेवेसाठीच आपली नियुक्ती झाली आहे, याची जाणीव ठेवून आदिवासी लोकांसाठी सर्वांनी प्रामाणिकपणे काम करावे, अशा सूचना अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य जतोथु  हुसेन यांनी दिल्या.

नियोजन भवन येथे अनुसूचित जमातीच्या योजनांचा तसेच अडअडचणीबाबत आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. मंचावर आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, आनंद रेड्डी, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.

शासकीय योजनांमधून आदिवासी लाभार्थी कुटुंबाला प्रति महिना 15 ते 20 हजार रुपये मिळकत होईल, अशा वैयक्तिक स्वरुपाच्या योजना द्याव्यात, असे सांगून जतोथू हुसेन म्हणाले, आदिवासी मुलांचे शिक्षण चांगल्या पध्दतीने करा. आपण जनतेचे सेवक आहोत, या भावनेतून सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. कोणाचे नुकसान करू नका. याबाबत ग्रामस्तरावरील यंत्रणेला सुचना द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी सादरीकरण केले. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००००

मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात2 लक्ष 70 हजार अर्ज प्राप्त

 

मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात 2 लक्ष 70 हजार अर्ज प्राप्त

Ø  तालुका स्तरावर वॉररुम कार्यान्वित

चंद्रपूरदि.31 : मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात आजपर्यंत 2 लक्ष 70 हजार ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. तसेच 27 जुलैपासून ऑनलाईन अर्ज तपासणीचे काम सुरू झाले असून प्रत्येक तालुका स्तरावर वॉररूम तयार करण्यात आली आहे. यात तहसीलदारगटविकास अधिकारीबालविकास प्रकल्प अधिकारी यांचा समावेश आाहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन हे या योजनेच्या कार्यप्रणालीवर वैयक्तिक लक्ष ठेवून आहेत.

अर्जदारांसाठी सुचना : 1) ज्या यंत्रणांनी ऑफलाईन अर्ज जमा केले आहेत त्यांनी तातडीने अर्ज ऑनलाईन करावे. अर्जदारांनी आपला अर्ज ऑनलाईन असल्याची खात्री करावी. यासाठी अर्ज ऑनलाईन झाल्याचा एसएमएस आला की नाही हे तपासावे. ज्यांना असा एसएमएस आला नसेल त्यांनी अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज ऑनलाईन भरून घ्यावा. 2) अर्जाची तपासणी होऊन अर्ज मंजूर झाला असेल तर त्याबाबत अर्ज मंजूर झाल्याचा एसएमएस अर्जदाराच्या मोबाईलला येणार आहे. ज्या अर्जदाराचे अर्ज काही कारणाने नामंजूर झालेले असेल अशा अर्जदारांना याबाबत एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. 3) अर्ज नामंजूर झाल्याची कारणे ज्या मोबाईल मधून अर्ज भरला असेल तेथे दिसून येईल. अर्ज दुरुस्त करण्याची एक संधी अर्जदारास असणार आहे. त्यामुळे अर्जदाराने अशा अर्जातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करून अर्ज सबमिट करावा, ही संधी एकदाच असून त्यानंतर अर्ज कायमचा बाद होईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.

००००००००

जिल्ह्यात 1 ऑगस्ट पासून महसूल पंधरवडाचे नियोजन

 


जिल्ह्यात 1 ऑगस्ट पासून महसूल पंधरवडाचे नियोजन

चंद्रपूरदि. 31 : शासन निर्णयानुसार जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून महसुल पंधरवडा साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी 1 ते 15  ऑगस्ट पर्यंत दैनंदिन कार्यक्रम आखून देण्यात आला आहे.

त्याप्रमाणे 1 ऑगस्ट रोजी महसुल दिन साजरा करणे व महसुल पंधरवाड्याचा शुभारंभ म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत कार्यक्रम घेणे. यासाठी प्रत्येक तहसील कार्य क्षेत्रातील  मुख्यालयी / महापालिका मुख्यालयाच्या प्रभाग मुख्यालयी /नगरपालिका-नगरपंचायत मुख्यालय/ प्रत्येक अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्यालयी शिबिराचे आयोजन करावे. या शिबिरामध्ये योजनेची प्रचार प्रसिध्दी करणे. अर्जासोबत जोडणे आवश्यक असलेल्या आवश्यक सर्व प्रमाणपत्राचे वितरण करणे. योजनेकरीता अर्ज करण्याकरीता मार्गदर्शन करणे. परिपूर्ण प्रस्ताव स्वीकारणे. रेशनकार्ड मधील दुरुस्ती/ नविन रेशन कार्ड देणे. आधारकार्ड मधील दुरुस्त्याबाबत कामकाज करणे अपेक्षित आहे.

            याबाबतचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या स्वाक्षरीचे परिपत्रक सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व मुख्याधिकारी आणि सर्व बालविकास प्रकल्प अधिका-यांना पाठविण्यात आले आहे.

००००००

Tuesday 30 July 2024

पूरग्रस्तांच्या वाढीव मदतीसाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार




 

पूरग्रस्तांच्या वाढीव मदतीसाठी प्रयत्न करणार  – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø  शासकीय मदत वाढविण्यासंदर्भात मंत्रीमंडळात मुद्दा मांडण्याची ग्वाही

चंद्रपूरदि. 30 : 19 जुलैपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यात अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धान्यभांडीबक-याकोंबड्याबैलजोडी आदी वाहून गेले आहेत. पूरपिडीतांचे नुकसान मोठे आहे. शासन आणि प्रशासनाने शासन निर्णयानुसार अति तातडीची मदत म्हणून नुकसानग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 5 हजार रुपयांची मदत दिली आहे. मात्र ही मदत अतिशय कमी असून पूरग्रस्तांना वाढीव मदत मिळावीयासाठी शासन निर्णयात बदल करण्याचा मुद्दा मंत्रीमंडळात आपण आवर्जुन मांडूआणि वाढीव मदतीसाठी पूर्णशक्तीनिशी प्रयत्न करूअशी ग्वाही राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा रविवारी वन अकादमी येथे आढावा घेतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनचंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकरमनपा आयुक्त विपीन पालीवालनिवासी उपजिल्हाधिकारी संजय पवारउपवनसंरक्षक श्वेता बोड्डूनियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडेराहूल पावडेरामपालसिंगब्रिजभुषण पाझारे आदी उपस्थित होते.  

शासन निर्णयानुसार पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 5 हजार रुपये देण्यात येतेमात्र ही मदत 5 हजारावरून 10 हजार रुपये करण्यात यावीयासाठी मंत्रीमंडळात हा विषय मांडण्यात येईलअसे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेनैसर्गिक आपत्तीत शेतीचे नुकसान झाल्यास कोरडवाहू क्षेत्राकरीता 8500 रुपये तर सिंचन असल्यास 17 हजार रुपये प्रति हेक्टर पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येते. त्यामुळे यात बदल करून संपूर्ण लागवड क्षेत्राकरीता नुकसान भरपाई देण्यात यावी. अतिवृष्टी अथवा पुरामुळे जमीन खरवडून गेली तर शासन निर्णयानुसार 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाते. ही मर्यादा 3 हेक्टर पर्यंत वाढविण्यात यावी.

पूर परिस्थितीत मत्स्यबीज / मासे वाहून गेल्यास त्याची नुकसान भरपाई मत्स्यसंस्थेस देण्यात यावी. नैसर्गिक आपत्तीत मामा तलावांचा बंधारा व कालवे यांच्या दुरुस्तीकरीता अनुदान देण्यात यावेहे सर्व विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूअशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच शेतात साठविलेली खतेबियाणे पूर्णपणे नष्ट झाल्यास संबंधित शेतक-यांनी त्याचे फोटो काढून ठेवावे आणि कृषी विभागाकडे अर्ज सादर करावा. जेणेकरून याबाबत मदत देय आहे काते तपासण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

यावेळी चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी सादरीकरण केले. बैठकीला तहसीलदारगटविकास अधिकारीन.प. मुख्याधिकारी यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी नागरिकांनीही आपल्या समस्या मांडल्या.

पंचनामे करतांना संवेदनशील रहा : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त घरांचे तसेच शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ग्रामस्तरावरील पंचनामे करणारे तलाठीकृषी सहायकग्रामसेवकमंडळ अधिकारी आदींनी अतिशय संवेदनशीलपणे पंचनामे करावेत. संकटाच्या काळात पूरपिडीत कुटुंबाला जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा. तसेच पंचनाम्याच्या वेळी गावक-यांनी सुध्दा आवर्जुन उपस्थित राहावे. एकही पूरपिडीत कुटुंब पंचनामापासून वंचित राहू नयेयाची काळजी घ्यावीअसे आदेशही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

०००००००

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1503 प्रकरणे यशस्वीपणे निकाली



राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1503  प्रकरणे यशस्वीपणे निकाली

चंद्रपूर,दि. 30 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस. एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1503 प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली.

या लोक अदालतीमध्ये एकूण 10804 प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे व 14343 दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1071 न्यायालयीन प्रकरणे तर 432 दाखलपूर्व अशी एकूण 1503 प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची 20 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई 1 कोटी 70 लक्ष रुपये वसुल करण्यात आले. कौटुंबिक वाद प्रकरणांपैकी 2 प्रकरणामध्ये पक्षकारांनी एकत्र राहण्याचा समजुतीने निर्णय घेतला. धनादेश प्रकरणांपैकी 139 प्रकरणे निकाली काढण्यात आली. कामगार न्यायालयातील  6 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यातील  सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीशसर्व वकीलसर्व न्यायालयीन कर्मचारीपोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली. 

००००००

शेतकऱ्यांकरिता एनईएमएल पोर्टलवर बँक मॉडिफिकेशन सुविधा उपलब्ध

 शेतकऱ्यांकरिता एनईएमएल पोर्टलवर बँक मॉडिफिकेशन सुविधा उपलब्ध

चंद्रपूरदि. 30 : हंगाम 2023-24 मधील आधारभुत किंमत खरेदी योजनेअतंर्गत जिल्ह्यात धान व भरडधान्य खरेदी करण्यात आले आहे. धान व भरडधान्य खरेदी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे ऑनलाईन पध्दतीने एनईएमएल पोर्टल वरून पीएफएमएस प्रणालीद्वारे अदा करण्यात येतात.

तसेच एनईएमएल पोर्टलवर शेतकरी नोंदणी करताना धान खरेदीदार सब एजेंट संस्थाकडून शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड व इतर योग्य ती  माहिती न घेतल्यामुळे शेतकरी चुकारे अदा करताना अडचणी निर्माण होत आहेत. अशा अडचणीमुळे शेतकऱ्यांना चुकारे अदा करताना विलंब होत आहे. खरेदी केलेल्या धान व भरडधान्याचे काही शेतकऱ्यांचे खरेदी कालावधीमध्ये तसेच खरेदीनंतर काही बँकेचे आयएफएससी कोडमध्ये बदल झालेला असल्यामुळे शेतकरी  चुकारे परत येत आहेत.

तसेच ज्या शेतकऱ्यांचे चुकारे अदा करताना चुकीचे बँक खाते क्र., चुकीचे आयएफएससी कोड, डुप्लीकेट एन्ट्री, पेमेंट होल्ड रजिस्ट्रेशन न होणेफ्रीझ  खाते व संयुक्त खाते तसेच बँकेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी चुकारे हे शेतकऱ्यांचे खात्यात जमा झालेले नाहीत. त्या कारणास्तव शासनाकडून 14 ऑगस्ट 2024 पर्यंत एनईएमएल पोर्टलवर बँक मॉडिफीकेशन करीता कालावधी देण्यात आलेला आहे. तरी मुदतीमध्ये ज्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली आहे, त्याच खरेदी केंद्रावर जाऊन बँक मॉडिफीकेशन तात्काळ करून घ्यावे, जेणेकरून शेतकरी चुकारे करणे सोईचे होईल, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.एस. तिवाडे यांनी कळविले आहे.

०००००० 

जिल्हास्तरीय मैदानी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

 

जिल्हास्तरीय  मैदानी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

चंद्रपूर,दि. 30 :  केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाने खेलो इंडिया सेंटर अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुलचंद्रपूर येथे जिल्हास्तरीय मैदानी खेलो इंडिया अनिवासी प्रशिक्षण केंद्राकरिता सन 2024-25 या वर्षात खेळाडू निवड चाचणीचे आयोजन 6 ऑगस्ट 2024 या कालावधीत करण्यात आले आहे

याकरीता 14 वर्ष आतील मुले/मुली व 16 वर्षाआतील मुले/मुली करीता 6 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 निवड चाचणी होणार आहे. यात उंचीला प्राधान्य देण्यात येईल. सर्व खेळाडूंनी स्वत:च्या पूर्ण तयारीने यावे. प्रशिक्षण केंद्र हे अनिवासी आहे. आधार कार्ड व जन्मदाखला प्रत सोबत आणावे आणि किमान प्रशिक्षणार्थ्यांचा जन्म 12 डिसेंबर 2013 नंतरचा असावा.  

उपरोक्त निवड चाचणीकरिता ‍जिल्ह्यातील जास्तीत जास्त  खेळाडूंनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत नोंदणी करावे. अधिक माहितीकरिता राज्य क्रीडा मार्गदर्शक (बॉक्सींग) विजय डोबाळे (मो.क्र. 9545858975) व खेलो इंडिया प्रशिक्षक रोशन भुजाडे (मो. क्र. 7798174435 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड चंद्रपूर यांनी कळविले आहे.

००००००

तालुका, जिल्हा, म.न.पा.स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणे बंधनकारक

 

तालुकाजिल्हाम.न.पा.स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणे बंधनकारक

              चंद्रपूर,दि. 30 :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय पूणे  अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषदचंद्रपूर यांच्यावतीने सन 2024-25 या सत्रात तालुकाजिल्हा म.न.पा. स्तरीय  शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. तालुकास्तरावर 10 खेळ प्रकार तसेच जिल्हा व  म.न.पा. स्तरावर 93 खेळ प्रकार होणार आहे.

सदर स्पर्धा आयोजनाबाबतचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले असून तालुका क्रीडा संयोजक यांचेकडून प्राप्त करून घ्यावेत. सदर क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याकरिता ऑनलाईन नोंदणी सुरु झालेली असून dsochandrapur.co.in/School या वेबसाईटवर खेळाडू नोंदणी करण्यात येत आहे. करिता चंद्रपूर जिल्हयातील विविध तालुक्यातील शारिरीक शिक्षण शिक्षकांनी आपल्या शाळा/ महाविद्यालयातील जास्तीत जास्त खेळाडूंची विविध खेळ प्रकारात नोंदणी करून सहभाग घ्यावा. ज्या शाळा/ महाविद्यालये सहभाग नोंदविणार नाही त्या शाळांची नावे शिक्षण विभागाकडे योग्य कार्यवाहीकरिता प्रस्तावित करण्यात येईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

००००००

Monday 29 July 2024

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य जतोथु हुसेन यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य जतोथु हुसेन यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि . 29 : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य जतोथु  हुसेन व इतर दोन सदस्य यांचा दिनांक 3031 जुलै 2024 रोजी चंद्रपूर जिल्हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर  दौरा कार्यक्रमादरम्यान ते चंद्रपूर जिल्हयातील विविध  आदिवासी मुला/ मुलींचे वसतीगृह यांना भेटी देणार असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. तसेच जिल्हास्तरीय यंत्रणेशी  ‍विविध विषयावर चर्चा करुन नियोजन भवन चंद्रपूर येथे 31 जुलै रोजी आढावा घेणार आहेत.

संपर्क अधिकारी म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

000000

27 ऑगस्ट रोजी प्रसिध्द होणार मतदार यादी


 27 ऑगस्ट रोजी प्रसिध्द होणार मतदार यादी

Ø मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

चंद्रपूरदि.29 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या अनुषंगाने 27 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.

मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 25 जून ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत पूर्व – पुनरिक्षण उपक्रम राबविणे, 2 ऑगस्ट 2024 रोजी छायाचित्र मतदार यादीस प्रारुप प्रसिध्दी देणे, 2 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत दावे व हरकती दाखल करणे, निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करणे यांचा समावेश आहे.

तसेच 26 ऑगस्ट 2024 पर्यंत प्राप्त दावे व हरकती निकाली काढणे, मतदार यादी दोषरहित ठेवण्याकरीता आवश्यक बाबींची तपासणी करणे आणि अंतिम प्रकाशनासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे तसेच माहिती अद्ययावत करून मतदार यादीची छपाई करणे प्रस्तावित आहे. 27 ऑगस्ट 2024 रोजी मतदार यादी अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाने कळविले आहे.

०००००

चंद्रपूर जिल्ह्यातील 10 विद्यार्थ्यांना मिळणार व्यवसायिक पायलट प्रशिक्षण

 चंद्रपूर जिल्ह्यातील 10 विद्यार्थ्यांना मिळणार व्यवसायिक पायलट प्रशिक्षण

Ø ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2024

 चंद्रपूरदि.29 : नागपूर फ्लाईंग क्लब अंतर्गत चंद्रपूर फ्लाईंग समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील 12 वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र या विषयासह) झालेल्या 10 विद्यार्थ्यांना व्यवसायिक पालटल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता 29 जुलै ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत विहीत नमुन्यात ऑनलाईन पध्दतीने http://chandaflying.govbharti.org या संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत.

याबाबतची सविस्तर माहिती www.chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर प्रशिक्षण फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील स्थायी रहिवासी यांना घेता येईल. तसेच याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याकरीता अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी कळविले आहे.

००००००

Saturday 27 July 2024

कलेक्टर आणि सीईओ ! भर पावसात....धानाच्या शेतात






 

कलेक्टर आणि सीईओ ! भर पावसात....धानाच्या शेतात

Ø चिखल तुडवत यांत्रिकी आणि पारंपरिक पध्दतीने भाताची रोवणी

चंद्रपूरदि.27 : चंद्रपूर हा धान उत्पादक जिल्हा आहे. खरीप हंगामात जिल्ह्याचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र 4 लक्ष 58 हजार हेक्टर असून यापैकी 1 लक्ष 88 हजार हेक्टरवर (35 टक्के) भाताचे पीक घेतले जाते. सद्यस्थितीत जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने धानाच्या रोवणीने जोर पकडला आहे. अशातच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी भर पावसात धानाच्या शेतात हजेरी लावून चिखल तुडवत यांत्रिकी आणि पारंपरिक पध्दतीने धानाची रोवणी केली.  

मूल तालुक्यातील चिखली येथील प्रमोद कळसकर यांच्या शेतात यांत्रिक पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडामुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनमुलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व इतर अधिकारी प्रत्यक्ष बांधामध्ये उतरले. यावेळी त्यांनी स्वतः रोवणी यंत्र हाताळून यांत्रिक पद्धतीने तसेच पारंपरिक पद्धतीने भात रोवणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी यांत्रिकी पद्धतीने भाताची रोवणी कशी करतात याबद्दल तसेच यांत्रिक पद्धतीने तयार केलेले भात रोपाचे केक तयार करण्याची पध्दत जाणून घेतली.

पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली तर प्रति एकर चार ते साडेचार हजार रुपये रोवणीचा खर्च येतोमात्र यांत्रिकी पद्धतीने रोवणी केली तर एका दिवसात दोन एकर रोवणी करता येते. व एका एकराला जास्तीत जास्त एक हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे मजुरीची बचत होते आणि खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते. भात रोवणी यंत्राची किंमत 4 लक्ष रुपये असून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर उपलब्ध आहे. यांत्रिकी पद्धतीने भाताची रोवणी केल्यास योग्य अंतरावर लागवड होते. त्यामुळे पिकास योग्य प्रमाणात हवासूर्यप्रकाश मिळतो. परिणामी भाताचे फुटवे जास्त येतातबियाणे कमी लागते व उत्पादनात वाढ होते.

यावेळी कृषि उपसंचालक चंद्रकांत ठाकरेउपविभागीय कृषी अधिकारी श्री.व्यवहारेमूलच्या तहसीलदार मृदुला मोरेतालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाडगट विकास अधिकारी श्री. राठोड व कर्मचारी उपस्थित होते.

तालुक्यातील इतरही ठिकाणी भेटी : यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी  ग्रामपंचायत मारोडा येथील सोमनाथ ऍग्रो टुरिझम पर्यटन केंद्राला भेट देऊन पाहणी केली व येथील उपस्थितांच्या समस्या जाणून घेतल्या. सोबतच सोमनाथ येथील गोसदन प्रकल्पमारोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रगोबर्धन प्रकल्पास भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली.

यावेळी संध्या गुरनुले,  मारोडा येथील सरपंच व सदस्यग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप विभागीय अधिकारीबांधकाम विभागाचे उप विभागीय अधिकारीकृषी विभागाचे अधिकारीआरोग्य विभागाचे अधिकारीमंडळ अधिकारीपंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

 सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूरदि. 27 : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात उच्च शिक्षणाच्या द्वितीयतृतीय व चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याकरिता / स्वीकारण्याकरिता 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच याबाबतची निवड प्रक्रिया राबवून निवड यादी जाहीर करण्याकरिता 15 दिवसांची मुदत वाढ देण्यात येत आहे. त्यानुसार निवड यादी जाहीर करण्याचा सुधारित दिनांक 16 ऑगस्ट 2024 असा राहीलयाची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक आशा कवाडे यांनी केले.

0000000

राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंतांचे अर्ज सादर करण्याचे आवाहन

 राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंतांचे अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 27 : राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहे.  तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी https://mahakalasanman.org/pgeApplication Form ForUser.aspx  या संकेत स्थळावर जावून अर्ज करावे व ऑनलाईन केलेले अर्ज आणि संबंधित दस्ताऐवज अर्जधारकांनी आपल्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये सादर करावेतअसे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं.) जिल्हा परिषद यांनी केले आहे.

0000000

Friday 26 July 2024

27 जुलै रोजी अंगणवाड्या शाळा, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस बंद

 



27 जुलै रोजी अंगणवाड्या शाळा, महाविद्यालये  व खाजगी कोचिंग क्लासेस बंद

जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश

चंद्रपूर, दि.26 :  गत आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने शनिवार दि. 27 जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेस 27 जुलै 2024 रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहे. 

 जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होऊ नये, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेस यांना 27 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे व सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172 - 250077 तसेच 07172 -272480 या क्रमांकावर संपर्क करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

००००००

भर पावसात पालकमंत्री पूरपीडितांच्या भेटीला!









 भर पावसात पालकमंत्री पूरपीडितांच्या भेटीला!

Ø पोंभुर्णा तालुक्यातील चार गावांना प्रत्यक्ष भेट

Ø नुकसानाचे पंचनामे अतिशय गांभिर्याने करण्याचे निर्देश

चंद्रपूरदि. 26 : आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या काळात पूरपीडितांना मदतीचा हात देण्यासाठी राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सरसावले. लागोपाठ दोन दिवस भर पावसात त्यांनी पूर पीडितांच्या भेटी घेतल्या. पूरपीडितांच्या समस्या ऐकून घेतल्या.

पूरग्रस्त चिचपल्ली आणि पिंपळखुट येथे बुधवारी भेट दिल्यानंतर गुरूवारी पालकमंत्री पोंभुर्णा तालुक्यातील चार पूरग्रस्त गावांमध्ये पोहचले. पोंभुर्णा तालुक्यातील थेरगाव वेळवाआष्टा आणि बल्लारपूर (चेक) या पूरग्रस्त गावांचा दौरा केल्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथील विश्रामगृहात आढावा बैठक घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटेउपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंकेतहसीलदार शिवाजी कदमलघु पाटबंधारे विभागाच्या अभियंता प्रियंका रायपूरेसा.बा. विभागाचे अभियंता श्री. मेंढेतालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोडडॉ. मंगेश गुलवाडेप्रकाश देवतळेअल्का आत्रामसुलभा पीपरेअजित मंगळगिरीवारराहुल संतोषवारविनोद देशमुखहरीश ढवस आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणालेतलाठीग्रामसेवक यांनी अतिशय गांभिर्याने नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत. यात कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा होऊ देऊ नये. तसेच कोणत्या गावात कधी पंचनामे होणार आहेतयाबाबतचे वेळापत्रक तहसीलदारांनी गावकरी व पदाधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. नुकसानाच्या पंचनाम्यातून एकही जण सुटता कामा नये. यासाठी ग्रामपंचायतमध्ये सार्वजनिकरित्या पंचनाम्याची यादी वाचून दाखवावीअसे स्पष्ट निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले. तालुक्यातील ज्या गावात अतिवृष्टी झालीशेती पूर्णपणे बुडालीसंपर्क तुटला अशा सर्व गावांची यादी प्रशासनाकडे सादर करावी. जेणेकरून दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे नियोजन करता येईलअसेही त्यांनी सांगितले.

बंद रस्त्यांची यादी द्या : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील 11 रस्त्यांवर पुराचे पाणी आल्यामुळे सदर रस्ते पूर्णपणे बंद पडले. अशा रस्त्यांची यादी सादर करावी. पावसामुळे रस्ते बंद होऊ नयेयासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या पुलाची निर्मिती होऊ शकते कायाबाबत नियोजन करावे.  तसेच काही ठिकाणी पुलांची उंची वाढविण्यासंदर्भात बांधकाम विभागाने अहवाल व अंदाजपत्रक सादर करावेअश्या सूचना श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. अतिवृष्टीमुळे शाळांचेही नुकसान झाले आहे. त्यांच्याही दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तलावांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम : तालुक्यातील तलावांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम पाटबंधारे विभागाने हाती घ्यावा. तसेच सर्व तलावांची यादी करून प्रत्येक तलावाचे त्याचे स्वतंत्र टीपण तयार करावे. शेतरस्तेपाणंद रस्त्यांसाठी 15 दिवसांचा कार्यक्रम तयार करावा. अतिवृष्टीमुळे विद्युत खांब क्षतीग्रस्त झाले असून तारा तुटल्या आहेत. त्यामुळे विद्युत विभागाने तातडीने सर्व्हे करून प्रशासनाला अहवाल सादर करावा. यावेळी देवाडाखेरगाव टेकडीच्या बाजुला असलेला पूल उंच करणेजाम-तुकुम नाला खोलीकरण करणेदेवाडा खुर्द येथील नाला खोलीकरण करणेअशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.  

जखमी झालेले तसेच घरांचे नुकसान झालेल्या लोकांना आर्थिक मदत : पुरामुळे घरांचे नुकसान होऊन जखमी झालेल्या नागरिकांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. यात आकाश मेश्रामपौर्णिमा मेश्रामअविनाश मेश्रामचंदू सिडाम आणि निवृत्ती कन्नाके यांना प्रत्येकी 5400 रुपये मदत करण्यात आली. तसेच घरांचे नुकसान झालेल्या चेक बल्लारपूर येथील रवींद्र पिंपळशेंडेवामन पिंपळशेंडेशालिक कुळसंगे आणि संतोष मत्ते यांना प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे प्रातिनिधीक स्वरुपात पालकमंत्र्यांच्या हस्ते मदत देण्यात आली.

पोंभूर्णा तालुक्यात पावसामुळे झालेले नुकसान. : पोंभूर्णा तालुक्यात पावसामुळे अंदाजे प्राथमिक नुकसान 2130 हेक्टर असून बाधीत झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 2850 आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी तलाठीग्रामसेवककृषी सहाय्यक यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. पावसामुळे तालुक्यात एकूण बाधित कुटुंबे 23 आहे. अंशतः नुकसान झालेल्या कच्ची घरांची संख्या 89 असून पक्की घरे 4 आहेत. तसेच नष्ट झालेल्या गोठ्यांची संख्या 5 आहे. पूर्णतः नष्ट झालेल्या पक्के व कच्ची घरांची संख्या 2 आहे.

००००००