Search This Blog

Saturday 2 November 2024

वरोरा मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 8, 12 व 18 नोव्हेंबर रोजी

  

वरोरा मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 8, 12 व 18 नोव्हेंबर रोजी

Ø उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 2 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने 75 - वरोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी 8, 12 व 18 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. सदर खर्च तपासणी वेळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. त्यानुसार प्रथम खर्च लेखा तपासणी शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी सोमवार दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपकोषागार अधिकारी कार्यालय, वरोरा येथे करण्यात येईल.

75- वरोरा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक धर्मेंद्र सिंग हे वरील दिनांकास व वेळेस उपकोषागार अधिकारी कार्यालय, वरोरा येथे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहणार आहे. जे उमेदवार खर्चाचे लेखे तपासणीकरीता सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे वरोराचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दोन्तुला जेनित चंद्रा यांनी कळविले आहे.

००००००

बल्लारपूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 7, 11 व 17 नोव्हेंबर रोजी


 

बल्लारपूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 7, 11 व 17 नोव्हेंबर रोजी

Ø उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 2 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी 7, 11 व 17 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. सदर खर्च तपासणी वेळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. त्यानुसार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात प्रथम खर्च लेखा तपासणी गुरुवार दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी सोमवार, दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी रविवार दि. 17 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपविभागीय   अधिकारी कार्यालय, मूल येथे करण्यात येईल.

75 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक आदित्य बी. हे वरील दिनांकास व वेळेस उपविभागीय अधिकारी कार्यालय, मूल येथे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहणार आहे. जे उमेदवार खर्चाचे लेखे तपासणीकरीता सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे बल्लारपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी कळविले आहे.

००००००

चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर रोजी

 

चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर रोजी

Ø उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 2 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. सदर खर्च तपासणी वेळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. त्यानुसार चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात प्रथम खर्च लेखा तपासणी शनिवर दि. 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी बुधवार, दि. 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी मंगळवार दि. 19 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय, दुसरा माळा, चंद्रपूर येथे करण्यात येईल.

71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक आदित्य बी. हे वरील दिनांकास व वेळेस जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहणार आहे. जे उमेदवार खर्चाचे लेखे तपासणीकरीता सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी कळविले आहे.

००००००

निवृत्तीवेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपूर्वी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

 

निवृत्तीवेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपूर्वी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

             चंद्रपूरदि. 2 :  निवृत्ती वेतनधारकांची दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी हयात असल्याच्या प्रमाणपत्राची (Life Certificate) यादी संबंधीत बँकेसह पाठविण्यात येणार असून त्यावर आपल्या नावासमोरील रकान्यात निवृत्ती वेतनधारकांनी 30 नोव्हेंबर 2024 पुर्वी स्वत: उपस्थित राहून सदर यादीवर मोबाईल क्रमांकपॅन क्रमांकआधार क्रमांक नमुद करून स्वाक्षरी करावयाची आहे. जेणेकरून हयात असल्याचे प्रमाणपत्राची यादी कोषागाराला वेळीच प्राप्त होईल व त्यांचे माहे डिसेंबर 2024 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे वेळीच पाठविता येईल. 

           तसेच जे निवृत्तीवेतनधारक मनिऑर्डरद्वारे निवृत्ती वेतन घेतात, त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत कोषागाराला पाठवावे. खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आपण हयातीचा दाखला सादर करु शकता.

आपले पेन्शन खाते  असलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक अधिकाऱ्याच्या समक्ष हयात दाखल्याच्या यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करा. बँकेत जाऊ शकत नसल्यास जीवनप्रमाण या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने पुढीलप्रमाणे  हयात दाखला सादर करा. 1) https://jeevanpraman.gov.inया संकेतस्थळावर लॉगइन करा. 2) GENERAL LIFE CERTIFICATE वर क्लीक करा. 3) तुमचा आधार क्रमांक टाका. 4)  तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका आणि तुमचा हयातीचा दाखला काही सेंकदात प्राप्त करा. 5) तुमच्या जवळच्या  जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागाराला भेट द्या. 6) हयात दाखल्यावर बँक अधिकारी किंवा राजपत्रीत अधिकाऱ्याच्या समक्ष स्वाक्षरी करुन जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करा. 7) काही कारणानिमित्त परदेशात असल्यास तेथील भारतीय राजदुतामार्फत हयातीचा दाखला संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करा. 

हयात प्रमाणपत्र 5 डिसेंबर 2024  पर्यंत कोषागारास  प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2024 पासूनचे निवृत्तीवेतन बॅकेकडे पाठविले जाणार नाहीयाची कृपया नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी कळविले आहे.

००००००

आदिवासी उमेदवारांकरीता नि:शुल्क स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण

 

आदिवासी उमेदवारांकरीता नि:शुल्क स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण

Ø 26 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 2 :   आदिवासी उमेदवारांकरीता वर्ग-3 व  वर्ग-4 पदांकरीता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परिक्षेची तयारी करून घेण्याकरीता आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन  केंद्रचंद्रपूर येथे स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण दिनांक 1 डिसेंबर 2024 ते 15 मार्च2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन देय राहील.  या प्रशिक्षण कालावधीत खालील अटीची पुर्तता करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या एसटी प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी त्यांचे अर्ज 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत सादर करावेत.

            अर्जामध्ये स्वत:चे पूर्ण नावसंपूर्ण पत्तामोबाईल क्रमांकआधार क्रमांक, जन्मतारीखशैक्षणिक पात्रताप्रवर्ग (जात)जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंदचंद्रपूर यांचा नोंदणी क्रमांक इत्यादी बाबींचा उल्लेख करावा व सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. अर्ज करण्यांकरीता (Employment Card) असणे आवश्यक आहे.  उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन  केंदप्रशासकीय भवनपहिला माळाहॉल क्र.19चंद्रपूर येथे 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत सादर करावे. तसेच मुळ कागदपत्रासह 27 नोव्हेंब रोजी  सकाळी 11 वाजता वरील स्थळी मुलाखतीकरीता उपस्थित राहावे. निवड यादी दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.

          प्रशिक्षणाच्या अटी : 1) उमेदवार अनु.जमाती एसटी (आदिवासी ) प्रवर्गातील असावा. 2) उमेदवाराचे किमान वय 18 ते 38 चे दरम्यान असावे. 3) उमेदवार किमान एच.एच.एस.सी परीक्षा उर्त्तीण असावा. 4) उमेदवारांचे नांव जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंदचंद्रपूर  येथे नोंदणी केलेली असावे.

        आवश्यक कागदपत्रे : 1) शाळा सोडल्याचा दाखला. 2) जातीचा दाखला किंवा जात  वैधता प्रमाणपत्र. 3) मार्कशिट्स एसएसीसी/ एचएचएससी/पदवी 4) आधार कार्ड. 5) जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंदचंद्रपूर या कार्यालयाचे नोंदणी कार्ड.

०००००

आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी व खरेदी सुरू

 आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी व खरेदी सुरू

           चंद्रपूरदि. 2 : कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर व दि. महाराष्ट्र स्टेट का-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि.मुंबई  तर्फे जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रपूर  यांचे संयुक्त विद्यमानेहंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाच्या नाफेड/ एन.सी.सी.एफ मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गतसोयाबीन शेतमाल  खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी  कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथे सुरू आहे. 

सोयाबीन नोंदणी करीता 1) शेतीचा चालू वर्षाचा खरीप सोयाबीन पिकपेरा नोंद असलेला ई-7/12 व नमुना 8 अ2) बँक पासबुक 3) आधारकार्ड 4) मोबाईल  क्रमांक या आवश्यक कागदपत्रांसह सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांनीस्वत: कार्यालयात हजर राहून कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर येथे नोंदणी करून घ्यावी व शासकीय हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा.

तसेच बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना पाणपोईपिण्यासाठी पाणीशेतमाल मोजण्यासाठी वेट ब्रिज काटा व ईलेक्ट्रानिक्स वजनकाटेसी.सी.टिव्ही कॅमेरे इ. सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर येताना सोयाबीन शेतमाल व्यवस्थितरित्या साफ करूनवाळवून आणावाजेणेकरून आद्रता मोजतांना 12 टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. बाजार समितीचा एस.एम.एस. आल्यानंतर शेतकरी बांधवांनी आपला सोयाबीन शेतमाल केंद्रावर विक्रीसाठी आणावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

००००००