487 कुटुंबाला गॅस वाटप; विसापूरला ग्रामपंचायत इमारत उभारणार
चंद्रपूर, दि.28 जून- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातल्या सर्व महिलांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला असून यापुढे कोणत्याही महिलेला स्वयंपाक करतांना धुराचा त्रास सहन करावा लागणार नाही. माझ्या मतदार संघातील महिलांना देखील धुराचा त्रास होऊ नये, अशी लोकप्रतिनिधी म्हणून माझी इच्छा आहे. देशातील शंभर टक्के गॅस वापरणारा बल्लारपूर मतदारसंघ व्हावा, त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचा निर्धार विसापूर येथील कार्यक्रमात राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
27 जून रोजी सायंकाळी विसापूर येथे मध्य चांदा वनविभाग व वनपरिक्षेत्र बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेअंतर्गत विसापूर व नांदगाव पोडे येथील लाभार्थ्यांना एलपीजी कनेक्शन वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती असणाऱ्या या कार्यक्रमाला पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतच व्यासपीठावर चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, जिल्हा परिषद सदस्य हरीष गेडाम, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसिलदार विकास अहीर, विभागीय वनअधिकारी श्री.सोनकुसरे, किशोर पंदीलवार, सभापती गोंविंदा पोडे, विद्याताई गेडाम, सरपंच रिता गिल्टे, वैशाली बुद्दलवार, रमेश पिपरे, दिलीप खैरकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी विसापूर गावासोबत असलेल्या आपल्या जुन्या ऋणानुबंधांची उकल केली. ते म्हणाले 1995 मध्ये पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा एक कोटीचे सिमेंट रस्ते या गावासाठी आपण बनवले होते. संघर्षाची सुरुवात या गावापासून केली आणि संघर्ष कसा करायचा हे देखील या गावाने शिकवले. त्यामुळे विसापूर या गावाच्या संपूर्ण विकासाबद्दल आपण बांधील असून नजीकच्या काळात देशाच्या नकाशावर या गावाची ओळख बनेल. विसापूर जवळ नव्याने उभे राहत असलेले बॉटनिकल गार्डन, देशातील सर्वात सुंदर बॉटनिकल गार्डन होत आहे. ताडोबा येथे व्याघ्र दर्शनासाठी येणारे व जंगल पर् यटनाचा लाभ घेणारे पर्यटक काही दिवसांनी बॉटनिकल गार्डन बघायला सुद्धा येतील. या ठिकाणच्या नि र्माणाधीन क्रीडा स्टेडियमच्या बाबतही आपण अत्यंत आशावादी असून या अत्याधुनिक क्रीडा संकुलातून तुमच्या माझ्यात वावरणाऱ्या आदिवासी, बहुजन समाजातील एखाद्या मुलाने उद्या भारताचे प्रतिनिधित्व करत ऑलिपिंक पदक मिळवले तर नवल वाटायला नको ! त्या दृष्टीनेच आपण नियोजन करत असून त्यासाठी सर्व सोयी-सुविधांनी उभ्या राहणा-या क्रीडांगणाचा वापर केला जाईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी हा जिल्हा रोजगार मुक्त जिल्हा बनवण्यासा ठी सुरू असलेल्या प्रयत्नाबाबत उपस्थितांना माहिती दिली. बल्लारपूर मधील डायमंडकटिंग सेंटर सोबतच बल्लारपूर मध्ये रेडिमेट कपड्याच्या संदर्भात महिलांना मोठा रोजगार उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. बचत गटांना गावागावात उभारण्यात येणाऱ्या ऑरो मशीन चालवण्याचे काम दिले जात आहे. त्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करण्याबाबत आपण पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. विसापूरसह 57 गावांना दिवाबत्तीची व्यवस् था करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी विसापूर गावां मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबा ई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभा करण्याच्या संदर्भा तआलेल्या प्रस्तावाचे तातडीने स्वागत केल्याचे लक्षात आणून दिले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सौदर्यीकरणही केले असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरातील गरीब लोकांना धान्य वाटपाच्या संदर्भात लवकरच अभिनव कार्यक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी उपस्थित विसापूरच्या नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी लवकरच विसापूरची देखणी ग्रामपंचायत इमारत बांधणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी प् रातिनिधिक स्वरूपात एलपीजीगॅस कनेक्शन वितरणही त्यांनी केले.
No comments:
Post a Comment