संसद ग्राम, खासदार निधी,दिशा व कायदा सुव्यवस्था
संदर्भात विविध बैठकांचे आयोजन
चंद्रपूर दिनांक 8- जून : चंद्रपूर जिल्ह्याच्या लगतच्या भागांमध्ये गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असताना यवतमाळ आणि नागपूर या भागावर करडी नजर असणाऱ्या पोलीस विभागाने सीमावर्ती राज्यातूनही यासंदर्भातील तस्करी होत आहे काय याबाबत कडक नाकाबंदी करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज दिले. जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त पोलीसअधीक्षक हेमराज सिंह राजपूत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज विविध विभागाच्या आढावा बैठकी घेतल्या. आज सकाळी दहा वाजता त्यांनी खासदार निधी संदर्भात बैठक घेतली. गेल्या वर्षभरात खासदार निधीतून झालेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रलंबित असलेल्या कामाबाबत संबंधित विभागाला जाब विचारला तर पुढील वर्षाच्या नियोजनामध्ये वेगवेगळ्या कामांची सूचना केली. जिल्हाभरातील कामांमध्ये पायाभूत सुविधा निर्मितीमध्ये या निधीचा खर्च अधिकाधिक होईल, याकडे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचा आग्रह त्यांनी या बैठकीमध्ये केला. तसेच 2018-19 यावर्षीच्या कामाच्या अंदाजपत्रकाला सादर करण्याबाबत आव्हान केले. या बैठकीला आमदार नानाभाऊ शामकुळे ,आमदार संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आयुक्त संजय काकडे, नियोजन अधिकारी गजेंद्र वायाळ उपस्थित होते.
दुपारी बारा वाजता सांसद आदर्श ग्राम बैठक झाली या बैठकीमध्ये विकास कामांमध्ये येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा व सिंचनाच्या संदर्भातील अडचणी दूर करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. तर कृषी विभागाने बायोगॅस प्रकल्पाबाबत गतिशील व्हावे .असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत बचत गटांना शेळीपालन व शेड साठी निधी उपलब्ध करण्यात यावा व काम नियोजित करण्यात यावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली
सायंकाळच्या बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कोळसा चोरी व मध्य तस्करीच्या मुद्द्याला हात घातला. या बैठकीमध्ये चंद्रपूरच्या आमदार नानाभाऊ
-----2---
शामकुळे, महापौर अंजली घोटेकर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आदकी मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून येणाऱ्या चोरट्या आणि बोगस मद्याच्या तस्करीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन अहिर यांनी केले. तस्करी सोबतच बोगस मद्यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्य खेळ सुरू असून याबाबत नेमक्या त्रुटी कुठे राहत आहेत याची चौकशी करण्याचेही आदेश त्यांनी या बैठकीत दिले.
0000000000
No comments:
Post a Comment