चंद्रपूर दिनांक 8 : छोट्या-छोट्या नागरी पतसंस्था यांच्या निर्मितीमागे सामान्य माणसाला आर्थिक मदत करून त्याला उद्योग-व्यवसायाला गतिशील करावे हा उद्देश होता. समाजातील आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी नागरी पतसंस्थांनी सामान्य माणसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारी यंत्रणा व्हावे ,असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यामध्ये धनश्री नागरी सहकारी पतसंस्थेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बँकेचे मुख्य प्रवर्तक सुधाकर इंगोले, बँकेचे अध्यक्ष अजय गोगुलवार, उपाध्यक्ष महेश टहलियानी , संचालक विनोद चौधरी, मोतीलाल टहलियानी , देवराम मुद्दमवार , सचिन चिंतावार, दिलीप जगनाडे , दिनेश क्हाडे, प्रशांत कामीडवार , मारोती रामशेट्टीवार ,आनिता गोगुलवार , किशोरी दांडेकर , अर्जुनसिंह स्वामी , नामदेव मंगरे आदी उपस्थित होते .
यावेळी बँकेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी राष्ट्र सर्वोच्च आणि प्रथम असे म्हणणारे डॉ हेडगेवार यांच्या नावाने या पतसंस्थेत सभागृह उभारल्याबद्दल संचालकांचे कौतुक केले. देशामध्ये मोठ्या प्रमाणात इंडिया ,हिंदुस्थान ,भारत अशी विभागणी झाली असून ही विभागणी कमी करायची असल्यास सत्प्रवृत्तीच्या लोकांनी आपले संघटन वाढवायला हवे , असे आवाहन त्यांनी केले .
या पतसंस्थेच्या मार्फत गरीब गरजू , वंचित सर्वांना आर्थिक स्थैर्य मिळावे , अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .जिल्हयात आगामी काळात उभ्या राहणाऱ्या विविध प्रकल्पाची त्यांनी माहिती दिली .मूल हे महाराष्ट्रातील सर्वात उत्तम तालुक्याचे ठिकाण व्हावे यासाठी आपण कायम प्रयत्नरत असू याचा पुनरुच्चार त्यांनी केला . यावेळी उपस्थित जनसमूदायाला त्यांनी विकास कामांच्या या प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले .मूल या शहराला तांदुळ क्लस्टर बनवण्याबाबत समूह शक्तीने प्रयत्न करा , असे आवाहनही त्यांनी केले . कार्यक्रमाचे संचालन रामभाऊ महाडोळे यांनी केले .
00000000
No comments:
Post a Comment