Search This Blog

Monday 11 June 2018

उपविभागीय कार्यालयात समस्या घेऊन येणारा प्रत्येक नागरिक आनंदी होवून जावा- ना.सुधीर मुनगंटीवार




बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न

          चंद्रपूर, दि.10 जून - बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालयात समस्या घेऊन आलेला प्रत्येक नागरिक  आनंदी होवून गेला पाहिजे अशा प्रकारचे अधिकारी व कर्मचा-यांनी काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे वित्तनियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते आज होते.
          या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर तर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेलप्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रेबाधकांम विभागाचे अधीक्षक अभियंता डी.के.बालपांडेबल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्माकार्यकारी अभियंता मनोज जैस्वालउपविभागीय अधिकारी क्रांती डोंबेपंचायत समिती सभापती गोंविदा पोडेनपच्या उपाध्यक्षा मिनाताई चौधरीमुख्याधिकारी विपीन मुद्दा यांची प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार म्हणालेउपविभागीय कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचा-यांना सर्व सोयी सुविधा निर्माण करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कार्यालायतील प्रत्येक कर्मचा-यांनी आपली जबाबदारी समजून या कार्यालयात आलेल्या नागरिकांची  कामे करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. बल्लारपूर शहरात बस्थस्थानकपोलीस स्टेशनस्टेडीयमनाट्यगृह आदी विकासकामे  पूर्ण झाली असून लवकरच त्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.  बल्लारपूरमध्ये नागरिकांसाठी मोठया प्रमाणात सोयी सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. नगर परिषदेच्या माध्यमातून  बल्लारपूर शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी शहरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही ना.मुनगंटीवार यांनी केले.
          या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर म्हणालेदेशात व महाराष्ट्रात आमचे सरकार आले तेव्हापासून सिंचनशेतीकौशल्य विकासपर्यटनरोजगार निर्माण करण्याचे कामे आम्ही मोठया प्रमाणात करीत आहोत. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात मोठया प्रमाणावर विकासकामे केली आहेत. सैनिकी शाळा बॉटनिकल गार्डनवन अकादमीबांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र असे विविध विकास प्रकल्प त्यांच्या पुढाकाराने कार्यान्वित होत आहे. या विभागाचा खासदार म्हणून मला ह्याचा अभिमान असल्याचे ना. अहिर यावेळी बोलताना म्हणाले.

          यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेलबल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा व जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
          यावेळी नगर परिषदेच्या 26 सेवानिवृत्त कर्मचा-यांना त्यांच्या थकीत असलेल्या रकमेचे धनादेशविधवापरित्यक्ता महिला व पुरुषांना धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हसते करण्यात आले. तसेच नगर परिषदेच्या वतीने डस्टबीन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी केले. संचालन विजय जांभुळकर यांनी तर आभार तहसिलदार विकास अहिर यांनी मानले.  यावेळी मोठया संख्येने नगर परिषद, तहसिल कार्यालयाचे अधिकारीकर्मवारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                            000

No comments:

Post a Comment