Search This Blog

Monday 11 June 2018

महाराष्‍ट्रात चंद्रपूर जिल्‍हयाचा आदर्श प्रस्‍थापित करू – ना. सुधीर मुनगंटीवार



50 गावांमधील जलशुध्‍दीकरण संयंत्रे देखभाल व
दुरूस्‍तीसाठी महिला बचतगटांना हस्‍तांतरीत

               चंद्रपूर, दि.10 जून- चंद्रपूर तालुक्‍यातील 50 गावांमध्‍ये जलशुध्‍दीकरण संयंत्र बसविण्‍याची प्रेरणा उथळपेठ या गावातील प्रयोग यशस्‍वी झाल्‍यामुळे मला मिळाली. आता दुस-या टप्‍प्यात वेकोलिच्‍या सीएसआर निधीच्‍या माध्‍यमातून बल्‍लारपूर शहर व तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागात 29 ठिकाणी वॉटर एटीएम बसविण्‍यासाठी केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी मान्‍यता दिली आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात सुध्‍दा जलशुध्‍दीकरण संयंत्र बसविण्‍यात येतील. यासाठी सरकारचा कोणताही निधी न वापरता हा प्रयोग आम्‍ही राबविणार आहोत. पाण्‍याचा योग्‍य वापरत्‍याचे योग्‍य व्‍यवस्‍थापन हे कौशल्‍य मातृशक्‍तीला योग्‍य पध्‍दतीने अवगत असल्‍याने महिला बचतगटांना व्‍यवस्‍थापनाचा भार सोपविण्‍यात आला आहे. महिला बचतगटांनी ही जबाबदारी प्रभावीपणे राबवून महाराष्‍ट्रात चंद्रपूर जिल्‍हयाचा आदर्श प्रस्‍थापित करावा, असे आवाहन वित्त, नियोजन वनमंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्‍कृतीक सभागृहात आज आयोजित हस्‍तांतरण प्रमाणपत्र प्रदान सोहळयात ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते.  चंद्रपूर तालुक्‍यातील 50 गावांमध्‍ये भेल व महानिर्मीती कंपनीच्‍या सीएसआर निधीतून जलशुध्‍दीकरण संयंत्र अर्थात वॉटर एटीएम बसविण्‍यात आले आहेत. ही संयंत्रे देखभालदुरूस्‍ती व संचलन यासाठी महिला बचतगटांना हस्‍तांतरीत करण्‍यासाठी या सोहळयाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी आ.नानाजी शामकुळेमहाराष्‍ट्र वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल,महापौर सौ. अंजली घोटेकरजिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळेजि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे जिल्‍हाधिकारी सचिन कलंत्रेचंद्रपूर महाऔष्‍णीक विद्युत केंद्राचे मुख्‍य अभियंता जयंत बोबडेमनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, रोशनी खान, वनीता आसुटकर, पंचायत समिती सदस्या केमा रायपूरे, रामपालसिंग, प्रमोद कडू आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
            यावेळी बोलताना वित्त, नियोजन व वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्‍यक्‍त केले. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणालेमहिला बचतगटांना सदर जलशुध्‍दीकरण संयंत्रांच्‍या देखभाल व दुरूस्‍तीच्‍या दृष्‍टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. या जलशुध्‍दीकरण संयंत्रांच्‍या माध्‍यमातुन नागरिकांना शुध्‍द पाण्‍यासह पिण्‍यासाठी थंड पाणी देण्‍यात येणार आहे. यादृष्‍टीने संयंत्राला चिलर बसविण्‍यात आल्‍याचे सुध्‍दा ते यावेळी बोलताना म्‍हणाले. चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या सर्वांगिणविकासाचा संकल्‍प आम्‍ही केला आहे. जनता जनार्दनाच्‍या सहकार्याने हा संकल्‍प आम्‍ही निश्‍चीतपणे पूर्णत्‍वास नेऊ असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केला.
एकूण 50 महिला बचतगटांपैकी काही महिला बचतगटांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते हस्‍तांतरण प्रमाणपत्रे वितरीत करण्‍यात आले. तसेच जिल्हयातून 10 वी मध्ये प्रथम आलेली साक्षि मारोती वराटकर, व्दितीय गौरी प्रविण भोयर, तृतीय अंजली राजेश विचुरकर, चौथी गुंजन यादवराव खराबे, पाचवी सेजल सुनिल आयलनवार तर सहावी किशोरी दशरथ राजुरकर या मुलींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला महिला बचतगटांच्‍या पदाधिकारीसदस्‍या व नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन प्रशांत आर्वे यांनी केले तर प्रास्ताविक मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी केले.
                                                0000

No comments:

Post a Comment