Search This Blog

Monday, 11 June 2018

पिक कर्ज वाटपासाठी बँकांनी पुढाकार घेत काम करावे : गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे आवाहन


13  जून रोजी विभागीय बँक व्यवस्थापकांची नागपूर मध्ये घेणार बैठक

            चंद्रपूर दि 9 जून : जूनचा पहिला आठवडा सुरू झाला असताना देखील खरिपासाठी आवश्यक असणारे पिक कर्ज शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र जिल्ह्यात असून हे सर्व अपयश बँकांचे आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्याभरात यासंदर्भातील प्रक्रियेमध्ये गती आणणे आवश्यक आहे. सर्व बँकांनी शेतकऱ्यांना खाली हात पाठवू नये ,असे आवाहन गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व बँक अधिकाऱ्यांना केले .
           जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर  यांची काल एक महत्त्वपूर्ण बैठक झाली.  या बैठकीमध्ये आमदार नानाभाऊ शामकुळे ,आमदार संजय धोटेजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराज भोंगळेमहापौर अंजली घोटेकरप्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर ,महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडेनियोजन अधिकारी गजेंद्र वायाळ,  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवीद्र शिवदास  शिखर बॅकेचे एस.एन. झा यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी देखील उपस्थित होते.
             या बैठकीमध्ये जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या त्यासंदर्भातील टंचाईचे नियोजनविविध योजनांची कामे प्रधानमंत्री खनिज विकास निधी अंतर्गत येणारी कामे या संदर्भात गेल्या बैठकीत झालेल्या चर्चेवरील अंमलबजावणी आढावा घेण्यात आला . याशिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनादीनदयाळ अंत्योदय योजनादीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनाप्रधानमंत्री ग्राम सडक योजनाराष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमप्रधानमंत्री आवास योजना ( सर्वासाठी घरे शहरी योजना ) प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण )  स्वच्छ भारत मिशननॅशनल रुरल ड्रिंकिंग वॉटर प्रोग्रामप्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनाडिजिटल इंडियादिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजनाआदी योजनांचा आढावा घेण्यात आला.
 याच बैठकीमध्ये जिल्ह्यात आता सर्वाधिक गरज असणाऱ्या खरीप पीक कर्ज वाटप या योजनेबद्दल विस्तृत चर्चा झाली. या बैठकीला महसूल सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आहे. बँकेच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा केला आहे. मात्र असे असताना देखील बँक नव्या मोसमात शेतकऱ्यांना कर्ज वाटपासंदर्भात उदासीन असल्याचे चित्र योग्य नाही .जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना किती पैसे खरिपामध्ये वाटप करावे,यासंदर्भातला जिल्हा समितीने यापूर्वीच आराखडा मंजूर केला आहे. उद्दिष्ट असतानादेखील बँकेकडून त्या पद्धतीची कारवाई होत नसल्याचे दिसून येते. यापुढे बँकेच्या कोणत्याही शेतकऱ्याला परत जावे लागणार नाहीयासंदर्भात बँक व्यवस्थापनाने नियोजन करावे,असा इशाराही त्यांनी यावेळी सर्व बँक अधिकारी यांना दिला .
        कोणत्याही परिस्थितीत नजीकच्या काळात सर्व शेतकऱ्यांना खरिपाचे पीक कर्ज मिळाले पाहिजे. यामध्ये हयगय करणाऱ्या बँकांच्या संदर्भात त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात येईल व जाब विचारला जाईल. विदर्भातल्या सर्व बँकांना यासंदर्भातले आदेश त्यांच्या वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेले आहे. यासंदर्भात आपले विभागीय अधिकारी बोलणे झाले असून 13 जून रोजी नागपूर येथे सर्व विभागीय बॅंक अधिकाऱ्यांची बैठक लावण्यात आलेली आहे. 


00000000

No comments:

Post a Comment