चंद्रपूर दिनांक 8 मुल तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यात वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या आप्तेष्टांना व ज्यांची गुरे मृत्युमुखी पडली अशा शेतकऱ्यांना सानुग्रह निधीचे आज पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सावली या गावामध्ये 5 मे 2018 रोजी वीज पडून गंगाधर कवडू गंजीवार यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी श्रीमती कांताबाई गंगाधर गंजीवार यांना चार लाख रुपयाची मदत करण्यात आली. तसेच मौजा सिंदाळा येथे वीज पडून दोन महिलांचा मृत्यू दोन मे रोजी झाला नागेद बाबाजी घोंगडे या शेतकऱ्याला नुकसानभरपाई म्हणून 50 हजार रुपयांचा सानुग्रह निधी देण्यात आला. याशिवाय 23 मे रोजी मौजे बोंडाळा येथे एका बैलाचा मृत्यू झाला. यासाठी बोडाळा खुर्द येथील श्री उद्धव किसन नागपुरे या शेतकऱ्याला 25हजाराची मदत करण्यात आली.मुल तहसील कार्यालयामध्ये शुक्रवारी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धनादेश वितरित केले. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबाची आस्थेने चौकशी केली. यावेळी मुल नगर पालिकेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, उपविभागीय अधिकारी महादेव खेडेकर,तहसीलदार राजेश सरोदे उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment