Search This Blog

Friday, 30 January 2026

प्रत्येक बुधवारला महिलांसाठी रजोनिवृत्ती क्लिनीक


प्रत्येक बुधवारला महिलांसाठी रजोनिवृत्ती क्लिनीक

चंद्रपूरदि. 30 : सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील महिलांचे आरोग्य सुदृढ राखणेविशेषतरजोनिवृत्ती कालावधीत महिलांमध्ये होणाऱ्या शारीरिकमानसिक व हार्मोनल बदलावर योग्य वेळी वैद्यकीय उपचारतपासणी व समुपदेशन उपलब्ध करून देण्याकरीता 14 जानेवारी 2026 मकर संक्रांतीचे औचित्य साधून राज्यभरात रजोनिवृत्ती (मेनोपाज)  क्लिनिक सुरू करण्यात आले.

सदर योजनेच्या प्रभावी सुसूत्र अंमलबजावणी करण्याकरीता खालील पद्धतीने निर्देश देण्यात आलेमहाराष्ट्रातील सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयज्या ठिकाणी  स्त्रीरोगतज्ञ उपलब्ध आहेअशा ठिकाणी यापद्धतीचे विशेष क्लिनिक सुरू करण्यात आले आहे,  चंद्रपूर जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय वरोराचिमूर राजुरामुलब्रह्मपुरी व बल्लारपूर या ठिकाणी प्रामुख्याने हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहेया क्लिनिकमध्ये आठवड्यातून एक दिवस म्हणजे प्रत्येक बुधवारी मेनोपाज ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

यात स्त्रीरोग तज्ञाकडून तपासणीआवश्यक वैद्यकीय तपासण्याऔषधोपचारआहार व जीवनशैली विषयक मार्गदर्शन आणि मानसिक आरोग्य विषयक समुपदेशन करण्यात येत आहेकरिता महिलांनी  प्रामुख्याने 45 ते 50 वयोगटातील महिलांनी सदर सेवेचा लाभ घ्यावाअसे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे

००००००

Thursday, 29 January 2026

पालकमंत्र्यांच्या हस्ते लोहारा जंगल सफारी गेटचे उद्घाटन

 




पालकमंत्र्यांच्या हस्ते लोहारा जंगल सफारी गेटचे उद्घाटन

चंद्रपूरदि. 29 : चंद्रपूर वनविभागाअंतर्गत चंद्रपूर परिक्षेत्रात येत असलेल्या लोहारा येथे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांच्या हस्ते लोहारा जंगल सफारी गेटचे उद्घाटन करण्यात आलेयावेळी आमदार सुधीर मुनगंटीवारमुख्य वनसंरक्षक आरएमरामनुजमजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहपोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शनमनपा आयुक्त अकुनूरी नरेशताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉप्रभुनाथ शुक्लाउपसंचालक (कोरआनंद रेड्डीउपवनसंरक्षक योगेश वाघायेविभागीय वन अधिकारी राजन तलमलेलोहाराच्या सरपंच किरण सिध्दार्थ आदी उपस्थित होते.

लोहरा जंगल सफारी पर्यटन गेटद्वारे वन-वन्यजीव व्यवस्थापन करणेमानव व वन्यजीव यांच्यात सहजीवन प्रस्थापित करणेवनांचे  शाश्वत जतन करून लोकांचे वनावरील अवलंबन कमी करणे व वनांच्या माध्यमातून ग्रामीणांना रोजगार उपलब्ध देणेजुनेरस्ते व कुपरस्ते यांचा वापर करून 35 कि.मीचा परिसर पर्यटनासाठी उपलब्ध करण्यात आला आहेसदर क्षेत्रात एकूण 15 कृत्रिम पाणवठे व  नैसर्गिक लोहारा तलावाचा समावेश आहे.

या क्षेत्रात वाघबिबटरानगवेअस्वलरानमांजरहरीणचितळसांबरनिलगायचौसिंगासायाळरानकुत्रेमुंगुसमसण्याउदसायाळरानडुक्कर हे प्राणी तसेच विविध प्रकारची झाडेपक्षी व विविधरंगी फुलपाखरे यांचा समावेश आहे.

००००००

बौद्ध समाजातील संस्थांना पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान


 बौद्ध समाजातील संस्थांना पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान

Ø प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 20 फेब्रुवारीपर्यंत

चंद्रपूरदि. 29 : राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये 51 टक्क्यांपेक्षा जास्त बौध्द समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौध्द समाजातील सांस्कृतिकशैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी 10 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येतेया योजनेअंतर्गत पात्र संस्थाकडून 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहेजिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक मार्च 2026 आहेअसे प्रजिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी सुभाष कुमरे यांनी कळविले आहे.

००००००

Wednesday, 28 January 2026

शोक संदेश जनसामान्यांचा नेता हरवला : पालकमंत्री डॉ. अशोक उईके

 


शोक संदेश

जनसामान्यांचा नेता हरवला :  पालकमंत्री डॉ. अशोक उईके

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने जनसामान्यांचा नेता हरविला आहे. अजित दादांचा स्वभाव हा अतिशय मनमोकळा आणि निर्भीड होता. प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आणि राज्याच्या प्रश्नांची जाण असलेल्या या नेत्याला संपूर्ण महाराष्ट्र माहीत होता. अजितदादांचा अभ्यास अतिशय दांडगा असल्यामुळे त्यांची राज्याच्या राजकारणावर पकड होती. जनसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी नेहमीच पुढे येऊन मदत केली आहे.

वेळेच्या बाबतीत ते अतिशय काटेकोर असायचे. कार्यालयीन कामकाज असो  विधिमंडळातील भाषणे असो की सार्वजनिक व्यासपीठावर केलेले मार्गदर्शन असोत्यातून त्यांचे व्यक्तिमत्व झळकत होते. अशा या  उमद्या नेत्याला आज महाराष्ट्र मुकला आहे. ही राज्याचीच नव्हे तर देशाची अपरिमित हानी आहे. मंत्रिमंडळातील माझे सहकारी गमावल्याचे अतिशय दुःख आहे. दादांना विनम्र श्रद्धांजली.....

००००००


Tuesday, 27 January 2026

पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांची नियुक्ती


पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांची नियुक्ती

Ø चंद्रपूर महानगरपालिका महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक

Ø 10 फेब्रुवारी रोजी विशेष सभा

चंद्रपूरदि. 27 : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीकरीता 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी, या निवडणुकीच्या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची नियुक्ती केली आहे.

महानगरपालिका आयुक्त यांनी महापौर व उपमहापौर या पदांच्या निवडणुकीकरीता विशेष सभेचा दिनांक व वेळ निश्चित करून मिळण्याबाबत विभागीय आयुक्त नागपूर यांना विनंती केली होती. सदर पदाच्या निवडणूकीकरीता विशेष सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी असेल, अशी तरतूद आहे.

त्यानुसार आज (दि.27) दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या बैठकीतील विचारविनिमयाअंती, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर या पदांच्या निवडणुकीकरीता 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता राणी हिराई सभागृह, चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त यांच्यातर्फे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी निर्गमित केले आहे.

००००००

Monday, 26 January 2026

समाजातील दुर्बल घटक जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू – पालकमंत्री डॉ. वुईके








 

समाजातील दुर्बल घटक जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू – पालकमंत्री डॉ. वुईके

Ø प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम

Ø जिल्ह्यातील 100 टक्के शेतक-यांची फार्मर आयडी तयार

 

चंद्रपूरदि. 26 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या नेतृत्वात राज्य सरकार शेतकरीशेतमजूरमहिला भगिनीआदिवासीदलितवंचित यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हा प्रशासन दुर्बल घटकाच्या विकासासाठी भरीव कामगिरी करीत आहेअसे गौरवोद्वार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी काढले.

 पोलिस मुख्यालय येथे 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकरआमदार सुधाकर अडबालेजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहपोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शनमनपा आयुक्त अकुनूरी नरेश यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश देतांना पालकमंत्री डॉ. वुईके म्हणालेचंद्रपूर जिल्ह्यात ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत एकूण 3 लक्ष 33 हजार (100 टक्के) शेतक-यांची फार्मर आयडी तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 1073 गावातील 8257 हेक्टर झुडपी जंगल जमीनवन जमीन म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे 571 गावांचे डिलिस्टींगचे प्रस्ताव आणि अतिक्रमित जमिनीचे 149 गावांचे प्रस्ताव असे एकूण 720 गावनिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. यापैकी  249 प्रस्ताव वन विभागास सादर केले आहे.

 ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजने’ अंतर्गत जिल्ह्यातील 209 महिलांना विविध योजनांद्वारे 100 टक्के अनुदानावर लाभ देण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाच्या आदि कर्मयोगी अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 167 गावांची निवड  करण्यात आली आहे. जिल्ह्यात आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन अंतर्गत 17 हजार 431 कोटींची गुंतवणूक आणि 14 हजार 100 रोजगार निर्मिती होण्याबाबत करार झाले आहेत. प्रधानमंत्री शहरी आवास योजनेत 3526 घरकुल तर ग्रामीण आवास योजनेत 46 हजार 381 घरकुल पूर्ण झाले आहे.

पुढे पालकमंत्री डॉ. वुईके म्हणालेचंद्रपूर पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील किडनी रॅकेट प्रकरण उघडकीस आणले व त्यातील आरोपींना देशातील विविध भागातून अटक करुन उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्ह्यात सार्वत्रिक औषधोपचार मोहीम 10 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. घरी आलेल्या आरोग्य कर्मचा-यांच्या समक्ष गोळ्यांचे सेवन करून हत्तीरोग दूरीकरण करण्यास सहकार्य करावेअसे आवाहन त्यांनी केले.  तत्पुर्वी मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करून त्यांनी परेडचे संचलन केले.

उत्कृष्ठ कामगिरी करणा-यांचा सत्कार : विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणा-या अधिकारीखेळाडू व नागरिकांचा यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट उघटकीस आणणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचारे व त्यांचे सहकारीउत्कृष्ठ तपासाबद्दल सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी वाकडेव्हॉलीबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळावलिेली खेळाडू सखी दोरखंडेदृष्टीहीन बुध्दीबळ क्रीडा स्पर्धेत प्रथम आलेला वेद नीरज पौरराष्ट्रीय रायफल शुटींग चॅम्पियनशीपमध्ये प्रथम आलेली प्रेरणा मोरेराज्य ऑलिंपिक संघटनेत निवड झाल्याबद्दल डॉ राकेश तिवारी  यांचा समावेश होता.

०००००००

चंद्रपूरमध्ये 540 विद्यार्थ्यांचे भव्य कवायत संचलन



 चंद्रपूरमध्ये 540 विद्यार्थ्यांचे भव्य कवायत संचलन

Ø संविधान व प्रजासत्ताक मूल्यांचा जागर

 

चंद्रपूरदि. 26 : भारताची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली असून हा दिवस दरवर्षी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आल्याने 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून देशाच्या स्वातंत्र्यलोकशाही मूल्येसंस्कृती व इतिहासाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदशिक्षण विभागाच्या वतीने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या अंतर्गत देशभक्तीपर गीतांवर आधारित शालेय विद्यार्थ्यांचा कवायत संचलन कार्यक्रम जिल्हाभर राबविण्यात आला. जिल्हा पोलिस मुख्यालय येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात 540 विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर भव्य कवायत संचलन केले. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईकेखासदार प्रतिभा धानोरकरजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या सुमारे 2500 शाळांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या प्रेरणेने तसेच शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पाताळेशिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच दिवशी हा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी शहरातील निवडक 9 शाळांमधील 540 विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर प्रभावी कवायत संचलन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या कवायतीसाठी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी मनोज गौरकार यांनी नोडल ऑफिसर म्हणून तर शिक्षण विस्तार अधिकारी वर्षा पिपरे व संजय हेडाऊ यांनी सहायक नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी पार पाडली. कवायतीचे नेतृत्व एन. सी. सी. ऑफिसर मोरेश्वर बारसागडे यांनी केले. तसेच प्रदीप कळसकरसुनील माहुरे व साहिल चहारे यांच्या अथक परिश्रमातून विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण कवायत सादर केली.

सहभागी झालेल्या शाळा : चंद्रपूर येथील हिंदी सिटी हायस्कूल (60  विद्यार्थी)भवानजीभाई चव्हाण हायस्कूल (60  विद्यार्थी)लोकमान्य टिळक कन्या विद्यालय (60  विद्यार्थी)लोकमान्य टिळक विद्यालय (60  विद्यार्थी)बी.जे.एम. कार्मेल कॉन्व्हेंट (90  विद्यार्थी)मातोश्री विद्यालय (60  विद्यार्थी)विद्याविहार कॉन्व्हेंट (60  विद्यार्थी)प्रियदर्शनी कन्या विद्यालय (30  विद्यार्थी) आणि छोटूभाई पटेल हायस्कुल (60  विद्यार्थी) यांचा समावेश होता.

०००००००

 

Sunday, 25 January 2026

'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 






'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा

       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

* नांदेड येथे 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रमाला लाखो भाविकांची उपस्थिती 


* श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न 


* श्री गुरु नानक देवजी यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारे नऊ समाज प्रथमच लाखोंच्या संख्येने एकत्र


नांदेड दि.२५ (जिमाका) 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते.त्यांचे बलिदान आपल्याला सत्य, धर्म आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी निर्भीडपणे उभे राहण्याची प्रेरणा देते.त्यामुळेच त्यांचे विचार राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित 'हिंद दी चादर' श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत  होते.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण,राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री  बाबासाहेब पाटील, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे,नवी दिल्लीचे उद्योग,अन्न व नागरी पुरवठा मंत्री सरदार मनजिंदर सिंघ सिरसा,माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,खासदार डॉ.अजित गोपछडे,खासदार डॉ. भागवत कराड,आमदार प्रताप पाटील चिखलीकर,आमदार बालाजी कल्याणकर,आमदार श्रीजया चव्हाण,आमदार जितेंद्र अंतापूरकर, आमदार रवींद्र चव्हाण,राज्य अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी,विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार,गुरूव्दारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजय सतबीर सिंघ,शहीदी समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यावेळी उपस्थित होते. 


मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की,गुरू तेग बहादुर साहिब जी यांनी दिलेले बलिदान हे केवळ शीख धर्मासाठी नव्हते,तर या देशाची संस्कृती, सभ्यता, विचारधारा आणि धर्म यांच्या रक्षणासाठी होते.त्यांचा पराक्रम, वीरता,शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने समाज नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत एकत्र आला आहे.गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या बलिदानामुळे संपूर्ण देशात धर्म, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी लढण्याची नवी चेतना निर्माण झाली.त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहचावा, यासाठी शहीदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून प्रत्येक गावात,वाड्या-वस्त्यांवर जावून श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शीख गुरूंचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


श्री गुरु नानक देवजींना मानणारा, त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारा सर्व समाज एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. देशाच्या विपरीत परिस्थितीत श्री गुरु नानक देवजींनी एकत्र बांधणारा, भेदाभेद नष्ट करणारा महान विचार दिला आहे. त्या विचारांनी संपूर्ण देशात विविध समाजांना जोडण्याचे काम केले. हा विचार घेवून सर्व समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे.संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील महान संत होते. त्यांची समाधी पंजाबमधील घुमान येथे आहे.संत नामदेवांनी मांडलेले विचार,त्यांचे अभंग आणि पंक्ती यांना श्री गुरु ग्रंथ साहिबमध्ये स्थान मिळाले आहे. त्यांचे विचार गुरुबाणीचा अविभाज्य भाग बनले आहेत.यामुळे महाराष्ट्रातील वारकरी परंपरा आणि शीख समाज यांच्यातील अनोखे,अतूट नाते अधिक दृढ झाले आहे. श्री गुरु गोविंद सिंघ महाराजांच्या दीर्घकाळ वास्तव्याने नांदेडची भूमी पावन झाली आहे.या भूमीने सामाजिक सलोखा अधिक मजबूत करण्याचे काम केले असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.


उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवी सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी होते.जुलमी शासकांच्या दमनकारी धोरणांविरुद्ध विचार स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी दिलेले गुरु तेग बहादुर जी यांचे बलिदान हे अभूतपूर्व ऐतिहासिक उदाहरण असून,त्यांच्या निर्भय आचरणातून धार्मिक व नैतिक दृढतेचा आदर्श मिळतो,असे त्यांनी सांगितले. 


धर्मतत्त्वज्ञान जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी गुरु तेग बहादुर साहिब जी यांनी देशभर प्रवास करून आध्यात्मिक,सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी रचनात्मक कार्य केले.अंधश्रद्धा व अपप्रथांविरुद्ध त्यांनी प्रबोधन केले, तसेच विहिरी खोदणे, धर्मशाळा उभारणे, दानधर्म व प्राणीसेवा यांसारखी सार्वजनिक कल्याणाची कामे केली,असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.


आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी आपल्या भाषणाला मराठी भाषेत सुरुवात करत महाराष्ट्रात पुन्हा येऊन आनंद झाल्याचे सांगितले.श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानाच्या स्मरणासाठी होणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरेल,असे ते म्हणाले.गुरू तेग बहादूर जी यांच्या जीवनाचा आदर्श घेत युवकांनी देशाला नव्या उंचीवर घेवून जाण्याचा, तसेच देशाला अखंडीत ठेवण्याचा संकल्प करावा,असे आवाहन त्यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज,संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासातून सामर्थ्यासोबत सद्भाव जपण्याचा संदेश महाराष्ट्राने दिला आहे,असा उल्लेखही श्री. कल्याण यांनी केला.


दिल्लीचे उद्योग,अन्न व नागरी पुरवठा मंत्री सरदार मजिंदर सिंघ सिरसा म्हणाले, या समागम कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले, याचा आनंद आहे. अतिशय भव्य कार्यक्रमाचे आयोजन राज्य शासन व  नऊ समाजाच्या सहभागातून केले आहे.श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात आणला.नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत होत असलेल्या या समागम कार्यक्रमानिमित्त श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानत हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या मातीतील विविध समाजाला एकत्र आणणारा ठरल्याचे त्यांनी सांगितले.


संत ज्ञानी हरनाम सिंघ म्हणाले,संत नामदेव यांनी पंजाब आणि महाराष्ट्राला जोडण्याचे काम केले,त्यानंतर श्री गुरु गोविंद सिंघ यांनी महाराष्ट्रात येवून दोन्ही राज्यातील समाजाला जोडण्याचे काम केले. देशावर जेव्हा संकट आले,तेव्हा महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांनी शौर्य दाखविले.ज्या धार्मिक सभ्यतांसाठी श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांनी बलिदान दिले, त्या धार्मिक सभ्यता जपण्याचा,त्यांना आपल्या जीवनाचा हिस्सा बनविण्यासाठी संकल्प युवा वर्गाने करावा,असे आवाहन त्यांनी केले.शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा इतिहास समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. तसेच शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास घराघरात पोहचत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.


श्री गुरु नानक देवजी यांच्या विचारांवर श्रद्धा असणाऱ्या नऊ समाजांना पहिल्यांदाच एकत्र आणून आयोजित केलेला हा कार्यक्रम समाजाला जोडणारा आहे.नऊ समाज श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्याशी जोडले गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात तीन ठिकाणी होणाऱ्या शहीदी समागम कार्यक्रमांच्या निमित्ताने हे समाज पुन्हा एकत्र येत आहेत.शीख समाजाचा इतिहास शाळांमध्ये शिकवला जात आहे,ही अतिशय आनंददायी बाब असल्याचे गुरूव्दारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजय सतबीर सिंघ यांनी यावेळी सांगितले.


प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गुरू ग्रंथ साहिब जी यांचे दर्शन घेतले. तसेच यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते पंच प्यारे यांचा सन्मान करण्यात आला.त्यानंतर बाबा कुलवंत सिंघ,बाबा हरनाम सिंघ,बाबा बलविंदर सिंघ यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.


प्रास्ताविक अखिल भारतीय धर्म जागरण समितीचे प्रमुख शरदराव ढोले यांनी केले. शहीदी समागम कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यांनी आभार मानले.

           ०००००००००००००

हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी”




हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी

Ø ’बोले सो निहाल सत श्री अकालच्या जयघोषात लाखो भाविकांनी घेतले दर्शन

नांदेडदि. २५ जानेवारी:- हिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांसह लाखो भाविकांनी    वाहे गुरु व बोले सो निहाल सत श्री अकाल च्या जयघोषात श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले.

आज दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. देशातील विविध राज्यातून आलेल्या सर्व धर्माच्या भाविकांनी शांतताशिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत.

भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे. भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेताना दिसून येत आहेत. गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे.

कार्यक्रमाच्या ठिकाणी भाविकांसाठी लोकसहभागातून चहाअल्पोपहारज्यूसविविध स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्यागधर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहीदी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता व एकतेचा संदेश दिला जात आहे.

0000000

Saturday, 24 January 2026

हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी”



 

हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी

Ø मान्यवरांसह हजारो भाविकांची हजेरी

Ø श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनाने भक्तीचा महासंगम

नांदेडदि. २४ जानेवारी:- हिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनमाजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाणखासदार डॉ. अजित गोपछडेआमदार बालाजी कल्याणकरआमदार जितेश अंतापूरकरआमदार आनंदराव तिडकेआमदार श्रीजया चव्हाणपोहरादेवीचेमहंतसुनील महाराज,बाबुसिंग महाराजजिल्हाधिकारी राहुल कर्डीलेमनपा आयुक्त महेशकुमार डोईफोड यांच्यासह हजारो भाविकांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले.

सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.  सर्व जिल्ह्यातून व नांदेड शहरातून आलेल्या हजारो भाविकांनी शांतताशिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत.

भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे. भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेताना दिसून येत आहेत. गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्यागधर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहीदी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता व एकतेचा संदेश पोहोचत आहे.

0000000

Friday, 23 January 2026

तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी


 

तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी

 

  • हिंद दी चादर गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम

 

नांदेडदि. २३ : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी  समागम वर्षाचे औचित्य साधूनपवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिबनांदेड येथे एका भव्य आणि विशेष कीर्तन समागमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ३५० शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात केलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 'शब्द गुरबानी'च्या गायनाने उपस्थितीतांना मंत्रमुग्ध केले.

पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिबनांदेड बोर्डाद्वारे आयोजित हा कार्यक्रम संपन्न झाला.  हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे  ३५० व्या शहीदी समागम वर्ष निमित्ताने३५० विद्यार्थ्यांनी त्यांना ही अनोखी स्वरांजली अर्पण केली.

या कार्यक्रमास तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वाराचे  जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजीबोर्डाचे प्रशासक डॉ.  विजय सतबीर सिंघ (से. नि.भाप्रसे)हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईकजसवंत सिंग बॉबीगुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजीत सिंघ जी कडेवाले आदींची उपस्थिती होती. 

विद्यार्थ्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या गुरबानीच्या पवित्र स्वरांनी संपूर्ण  तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब परिसर आणि वातावरण भक्तिमय झाले होते. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी (संगत) मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. शालेय मुलांच्या या शिस्तबद्ध आणि भावपूर्ण सादरीकरणाचे मान्यवरांनी कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले.

0000

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था

 

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था

लाखो भाविकांसाठी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब व लंगर साहिब गुरुद्वारांकडून मोफत भोजन सेवा

 

नांदेडदि. २३ :- नांदेड येथे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी मोदी मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी नांदेडमध्ये दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या भोजनासाठी १२ भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली असूनही सेवा तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा व लंगर साहिब गुरुद्वारा यांच्या वतीने पुरविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पार्किंग स्थळांपासून रेल्वे स्थानकबसस्थानक व विमानतळ परिसरात विविध ठिकाणी मोफत सेवा स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. याशिवाय तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा तसेच गुरुद्वारा लंगर साहिब येथेही भाविकांसाठी भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या दोन गुरुद्वारांद्वारे भव्य निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

            या मोफत लंगर सेवेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगरनांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी यांनी केले आहे.

०००००

मतदान प्रक्रियेत सहभागी होणे हे लोकशाहीचे पहिले मुल्य – डॉ. व्यवहारे








मतदान प्रक्रियेत सहभागी होणे हे लोकशाहीचे पहिले मुल्य – डॉव्यवहारे

Ø 16 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा

चंद्रपूरदि. 23 :  भारतीय स्वातंत्र्यापासूनच आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला आहेआपल्या लोकशाहीची मूल्ये बालपणापासूनच आपल्या मनामध्ये रुजली पाहिजेआजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भवितव्य ठरविणार आहेत्यामुळेच राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना येथे आमंत्रित करण्यात आले आहे. 17 व्या वर्षी आपण मतदार नोंदणी करू शकतो व 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मतदानासाठी पात्र ठरतो.  कारण मतदान प्रक्रियेत सहभागी होणे हे लोकशाहीचे पहिले मुल्य आहेअसे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारे यांनी केले.

25 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी आल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने 23 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदान दिन साजरा करण्याचे निर्देश दिलेत्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात डॉव्यवहारे बोलत होतेयावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारउपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामउपजिल्हाधिकारी (निवडणूकशुभम दांडेकरजिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकरजिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकरचंद्रपूरचे तहसीलदार विजय पवारतहसीलदार (सामान्य्‍प्रिया कवळे आदी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकुंभार म्हणालेसंपूर्ण भारतात आज राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येत आहेनिवडणुकांमध्ये मतदार हा सर्वात महत्वाचा असल्यामुळे मतदार नोंदणी करणे आवश्यक आहेभारतात प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार दिला आहेमतदान न करणे अतिशय दुर्देवी असून मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे हे आपले कर्तव्य आहेआता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करता येते.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी शुभम दांडेकर म्हणालेनिवडणुका ह्या लोकशाहीचा अविभाज्य घटक आहेमुक्त आणि नि:पक्ष वातावरणात पारदर्शकपणे निवडणुका घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आहेसंविधान सभेत मतदानाचा सार्वत्रिक अधिकार’ या कलमावर सर्वांचेच एकमत झाले होतेत्यामुळे देशाच्या उज्वल भविष्यासाठी मतदार नोंदणी कराअसे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार विजय पवार यांनी केलेसंचालन सपना पिंपळकर यांनी तर आभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी शुभम दांडेकर यांनी मानलेयावेळी मोठ्या संख्येने केंद्रस्तरीयब्लॉकस्तरीय निवडणूक अधिकारीविद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मतदार दिनाची शपथ देण्यात आली.

मतदानाचा अधिकार हा सर्वात महत्वपुर्ण उपविभागीय अधिकारी मेश्राम

25 जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे आज राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येत आहेज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले असेल त्यांनी त्वरीत मतदार यादीत आपले नाव नोंदवावेलोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहेमतदार नोंदणी आता ऑनलाईनसुध्दा करता येतेमतदानाचा अधिकार हा सर्वात महत्वाचा अधिकार आहेअसे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी सांगितले.

नवमतदारांना ओळखपत्राचे वाटप : वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या नवीन मतदारांना मान्यवरांच्या हस्ते मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आलेयात रविना नालेमनाली राऊतकोमल सातरेभुमिका घाटोळेनयन घाटोळेआरुषी डोईजड यांचा समावेश होता.

उत्कृष्ट बीएलओ / पर्यवेक्षकांचा सत्कार : मतदान प्रक्रियेत उत्कृष्ट काम करणा-या बीएलओ पर्यवेक्षकांचा सत्कार करण्यात आलायात निलेश चु-हेविभा सहारेबंटी बिरीयासुरेश गौरकारप्रकाश होळंबेविजय खनके यांचा समावेश होता.  

००००००