राणी हिराई उमेद मार्ट येथे दिवाळी फराळ महोत्सव व विक्री प्रदर्शनी
चंद्रपूर, दि.23 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने 'राणी हिराई उमेद मार्ट, चंद्रपूर येथे 31 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दिवाळी फराळ महोत्सव-2026 चे आयोजन करण्यात आले आहे.
अभियानाच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहातील महिलांच्या हाताला (बचत गट) रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. यात खाद्य पदार्थ, पूजेचे साहित्य, नैसर्गिक व रेशमी हार, सजावटीचे साहित्य आणि विविध गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार असल्याचे उमेदचे जिल्हा अभियान सहसंचालक यांनी कळविले आहे.
०००००००

No comments:
Post a Comment