कर्ज मेळाव्यासह बँकाच्या इतर योजनांच्या माहितीकरीता
8 जून रोजी ‘ग्राहक क्रेडीट आऊटरीच प्रोग्राम’
चंद्रपूर, दि. 7 जून : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या सुचनेद्वारे जिल्ह्यातील शेतकरी व गरजू नागरिकांना बँकांचे कर्ज व इतर योजनांची माहिती व्हावी, या उद्देशाने ग्राहक क्रेडीड आऊटरीच प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे. बुधवार दि. 8 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता नियोजन भवन, चंद्रपूर येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आाले असून कृषी संबंधित सर्व योजना, कर्ज मेळावा आणि बँकांच्या इतर योजनांची माहिती या कार्यक्रमाद्वारे देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुरेश (बाळू) धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, विदर्भ झोनचे प्रबंधक तुषार हाते उपस्थित राहतील. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक व खाजगी बँका सहभागी होणार आहेत. यावेळी बँकेतर्फे तसेच विविध शासकीय योजना राबविणा-या कार्यालयांचे स्टॉल लावण्यात येतील. नागरिकांना योजनांची माहिती देण्यासाठी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.
या मेळाव्यात कृषी संबंधित सर्व योजना व बँकेतर्फे राबविण्यात येणा-या अटल पेंन्शन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, सुकन्या समृध्दी योजना यासह विविध फ्लॅगशिप प्रोग्राम व योजनांच्या लाभाचे प्रत्यक्ष वितरण प्रमाणपत्र व धनादेश देऊन करण्यात येईल. गरजू लोकांनी मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे यांनी केले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment