सामान्य परिचर्या व प्रसुतीशास्त्र अभ्यासक्रमासाठी
महिला उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित
Ø 24 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 23 जून : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिचर्या प्रशिक्षण संस्थांमध्ये दि. 1 ऑगस्ट 2022 पासून सामान्य परिचर्या व प्रसूतिशास्त्र अभ्यासक्रमाकरीता प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांना मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय पद्धतीने विहित प्रपत्रामध्ये अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज भरण्याची मुदत दि. 24 जून 2022 पर्यंत असणार आहे.
तरी, चिमूर प्रकल्प कार्यालयातंर्गत येत असलेल्या चिमूर, वरोरा, भद्रावती, नागभीड व ब्रह्मपुरी या पाच तालुक्यातील ईच्छुक महिला उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे चिमूर,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी के.ई. बावनकर यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment