Search This Blog

Thursday, 2 June 2022

ॲथलेटिक्स (मैदानी), बॅडमिंटन व कराटे खेळाच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

 


थलेटिक्स (मैदानी), बॅडमिंटन व कराटे खेळाच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

चंद्रपूर दि. 2 जून : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तालुका क्रीडा संकुल समिती, बल्लारपूर व एकविध खेळ जिल्हा क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर (विसापूर) येथे दि.2 ते 12 जून 2022 या कालावधीत सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत थलेटिक्स, (मैदानी), बॅडमिंटन व कराटे या खेळाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षण शिबिर हे 8 ते 18 वर्षाआतील खेळाडूकरीता राहणार असून जास्तीत जास्त खेळाडू उमेदवारांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment