Search This Blog

Wednesday, 15 June 2022

दहा दिवसीय उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप

 

दहा दिवसीय उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप

चंद्रपूर, दि. 15 जून : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूरतालुका क्रीडा संकुल समिती, बल्लारपूर (विसापूर) व एकविध खेळ जिल्हा क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवसीय उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर दि. 2 ते 12 जून 2022 पर्यंत आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरामध्ये ॲथलेटिक्स, कराटे, बॅडमिंटन या खेळामध्ये एकूण 172 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.  दहा दिवसीय शिबिराचा नुकताच समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाला सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक, चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स अॅम्युचुअर असोसिएशनचे सचिव सुरेश आडपेवार, रोटरी क्लब बल्लारपूरचे अध्यक्ष मनीष मुलचंदानी, नरेंद्रसिंग दारी, राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त शिवाजी नागरे व  उर्मिला नागरे आदी उपस्थित होते.

समारोपीय कार्यक्रमात राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त शिवाजी नागरे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ॲथलेटिक्स खेळामध्ये उत्कृष्ट खेळाडू काश रामीलावार, ध्येय ठाकरे, कराटे खेळामध्ये अंशुमन पटेल, साक्षी बहुरिया, बॅडमिंटन खेळामध्ये अनुष्का कावळे, हिमांशू रासेकर या खेळाडूंचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रशिक्षणातील प्रशिक्षक रोशन भुजाडे, विशाल चव्हाण, सुनील कांबळे, प्रमोद निलावार, ओमप्रकाश प्रसाद यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिकारी आर. डी. वडते यांनी तर कार्यक्रमाचे संचालन तालुका क्रीडा संयोजक किशोर मोहुर्ले यांनी केले.

००००००

No comments:

Post a Comment