Search This Blog

Thursday 16 June 2022

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता–शिवा पुरस्काराचे वितरण जुलैच्या पहिल्या आठवड्यात – बहुजन कल्याण मंत्री वडेट्टीवार

 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता–शिवा पुरस्काराचे वितरण जुलैच्या पहिल्या आठवड्यात – बहुजन कल्याण मंत्री वडेट्टीवार

Ø पुढील वर्षापासून प्रत्येक महसूली विभागातून दोन व्यक्ती व एक संस्थांची निवड  होणार

चंद्रपूर, दि. 16 जून  वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिकशैक्षणिकआर्थिक व संघटनात्मक विकास होण्यासाठी व या  समाजाच्या विकासासाठी उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्ती तसेच संस्थांना 'महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देण्यात येतो. गत सहा वर्षांचे पुरस्कार वितरण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर पुढील वर्षापासून या क्षेत्रात कार्य करणा-या प्रत्येक सात महसूली विभागातून दोन व्यक्ती व एक संस्था अशा एकूण राज्यातून 14 व्यक्ती आणि 7 संस्थांची या पुरस्कारासाठी निवड केली जाणार असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

        सहा वर्षापूर्वी 8 जून 2016 रोजी 'महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासंदर्भात  शासन निर्णय काढला होता. सन 2016-17 पासून गत सहाही वर्षाचे पुरस्कार वितरण झालेले नव्हते. सन 2016-17 मध्ये व्यक्ती म्हणून प्रा.मनोहर बाबाराव धोंडे आणि संस्था म्हणून औरंगाबाद येथील शिवा आखिल भारतीय वीरशैव युवक संघटनासन 2017-18 मध्ये व्यक्ती म्हणून अभय मनोहर कल्लावार, तर संस्था म्हणून लातूर येथील वीरमठ संस्थानसन 2018-19 मध्ये नांदेड येथील विठ्ठल ताकबिडे, सन 2019-20 मध्ये व्यक्ती म्हणून उमाकांत गुरूनाथ शेटे तर संस्था म्हणून परभणी येथील महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्थासन 2020-21 मध्ये व्यक्ती म्हणून रामलिंग बापूराव तत्तापूरे तर संस्था म्हणून सातारा येथील तीर्थक्षेत्र आदीमठ संस्थान धारेश्वरसन 2021-22 मध्ये डॉ.यशवंतराव बाबाराव सोनटक्के, आणि संस्था म्हणून नांदेड येथील सारथी प्रतिष्ठान आहे.

सर्व वर्षांच्या  व्यक्ती व संस्थाच्या पुरस्कारांचे वितरण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. संस्था व व्यक्तीची निवड प्रत्येक विभागातून केली जाणार असून संस्थेला 51 हजार रोख व व्यक्तीला 25 रूपये रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

तरी या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला या क्षेत्रात कार्य करणारे कलावंतसाहित्यिकसमाज प्रबोधनकारसमाज संघटक व समाजसेवक  यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. याबाबतचा शासननिर्णय 13 जून 2022 रोजी नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे.

                                                         ००००००

No comments:

Post a Comment