Search This Blog

Thursday, 2 June 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत जागतिक तंबाखू विरोधी दिन कार्यक्रम

 


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत जागतिक तंबाखू विरोधी दिन कार्यक्रम

चंद्रपूर दि. 2 जून : जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील समाजसेवा विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत जागतिक तंबाखू विरोधी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवने, सहयोगी प्राध्यापक डॉ. चारुहास आकरे, समन्वय अधिकारी भास्कर झळके, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट दुर्गाप्रसाद बनकर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी  उपस्थित होते.

तंबाखू सेवनाचे वाढत असलेले प्रमाण, तंबाखू धूम्रपानाचे आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम यावर उपाययोजनेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता.

 

याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवने यांनी व्यसनमुक्तीच्या संदेशाबाबत समाजात जनजागृती करावी व नागरिकांना व्यसनमुक्त राहण्याचा सल्ला दिला. तर समन्वय अधिकारी भास्कर झळके यांनी नैसर्गिक वातावरण व नैसर्गिक साधनसंपत्तीपासून मानव दूर जात असल्याने अनेक दुर्धर आजाराचा शिरकाव होत असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी शिंदे यांनी उपस्थितांना तंबाखू खाणे व व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ दिली. समाजसेवा महाविद्यालयाचे अधीक्षक हेमंत भोयर यांनी आपल्या प्रास्ताविकातून तंबाखू विरोधी दिन हा कार्यक्रम घेण्यामागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे  संचालन समाजसेवा अधीक्षक राकेश शेंडे तर आभार राजरत्न केळकर यांनी मानले.

०००००००

No comments:

Post a Comment