Search This Blog

Friday, 18 August 2023

रासायनिक खतांचा संतुलित वापर करून नॅनो खताचा वापर वाढवा

 

रासायनिक खतांचा संतुलित वापर करून नॅनो खताचा वापर वाढवा

Ø कृषी विभागाचे शेतक-यांना आवाहन

चंद्रपूरदि. 18 :  जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात कापूससोयाबीनभात व तूर या पिकाची लागवड होत आहे. पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी मुख्यत्वे नत्रस्फुरद व पालाश तसेच इतर मूलद्रव्यांची आवश्यकता असते. शास्त्रीय दृष्टिकोनातून आवश्यक असणा-या मुल घटकांच्या पुर्तीसाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करून नॅनो खतांचा वापर वाढवावा. तसेच पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत व जैविक खतांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

दाणेदार युरिया व डीएपी वापरामुळे पिकांना फक्त 30 ते 40 टक्के नत्र व 15 ते 20 टक्के स्फूरद उपलब्ध होतो व बाकीचा हवेच्या व पाण्याच्या माध्यमातून वाहून जातो. तर काही अंश जमिनीत स्थिर होतो. उदा. 1 बॅग (45 किलोग्राम ) यूरिया मध्ये 20.70 किलो नत्र असते. जमिनीत युरिया दिल्यानंतर झाडाला 7.24 किलो नत्र (35%) प्राप्त होऊन 13.46 किलो नत्र (65%) अमोनिया गॅस व (नायट्रेट) पाण्याच्या माध्यमातून लिचिंग द्वारे वाहून जाते. यावरून असे निदर्शनास आले आहे की, शेतकरी दाणेदार युरिया व डीएपीचा वापर करून आपल्या लागवड खर्चात वाढ करून पिकांची पोषक अन्नद्रव्यांची पूर्तता करू शकत नाही. दाणेदार युरिया व डीएपीचा वापर केल्याने जमीनपाणीहवा प्रदूषित होऊन जमिनीची उत्पादकता कमी होते. तसेच जमिनीतील लाभदायी जीवजंतू यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. सदर खतांचा कच्चामाल देशात उपलब्ध नसल्याने भारत सरकारला देखील अनुदानावर मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागतेपर्यायाने देशाच्या आर्थिक स्थितीवर याचा परिणाम होतो.

याकरिता भारत सरकारने नॅनो खते- नॅनो युरिया (द्रवरूप) व नॅनो डीएपी (द्रवरूप) नवीन संशोधनाद्वारे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. नॅनो युरिया व नॅनो डीएपी द्रवरूप हे 500 मिली पॅकिंग मध्ये असून नॅनो  युरिया मध्ये 4 टक्के नत्राचे प्रमाण तसेच नॅनो डीएपी मध्ये 8 टक्के नत्र व 16 टक्के स्फूरद एकूण वजनाच्या प्रमाणात असते. नॅनो युरिया व डीएपी द्वारे पिकांना नत्र व स्फुरद फवारणीच्या माध्यमातून उपलब्ध होते. नॅनो खतांची फवारणी केल्यानंतर नत्र व स्फुरद झाडाच्या पानावरीलबिया व मुळाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या छिद्रांच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश करते व पानांच्या पेशी मधील पोकळीमध्ये साठवले जाऊन पिकांच्या आवश्यकतेनुसार झाडाला उपलब्ध होते.  त्यामुळे नत्र व स्फुरद ही अन्नद्रव्ये विहित वेळेत योग्य त्या प्रमाणात पिकांना (86 टक्के)

उपलब्ध होतात. या नॅनो पद्धतीमुळे खतांचा संतुलित वापर होऊन जमीन हवा व पाणी या मूलभूत घटकांना प्रदूषण मुक्त ठेवता येते. लागवडीच्या खर्चात बचत होते व पिकांच्या भरघोस उत्पन्नाची हमी प्राप्त होते.

नॅनो खते- नॅनो युरिया (द्रवरूप) व नॅनो डीएपी (द्रवरूप) चा वापर :

1. पिकांच्या विविध अवस्थेत दोन वेळा फवारणी करून नत्र व स्फुरद या अन्न घटकांची पिकांना

पूर्तता करून देणे शक्य आहे. 2. दोन ते पाच मिली लिटर नॅनो खते प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकाच्या प्रमुख वाढीच्या अवस्थेनुसार फवारणी करावी. 3. नॅनो खतांच्या उत्तम परिणामासाठी पहिली फवारणी पिकाच्या फुटवे/फांद्या फुटण्याच्या अवस्थेमध्ये व दुसरी फवारणी पिकाच्या फुलोरा/ शेंगा लागणे 7-10 दिवस अगोदर करावी.

4. फवारणी सकाळच्या वेळेत कमी उन्हामध्ये आणि हवेच्या कमी वेगामध्ये करावी. 5. पाणी पूर्ण ओली  होण्यासाठी आणि नॅनो खते समप्रमाणात सर्वत्र मिसळण्यासाठी पंपाला फ्लॅट फॅन किंवा कट नोझल लावून फवारणी करावी. 6. नॅनो युरीया/ डिएपी फवारणी व्दारे देण्यात यावेठिबक व वाहत्या पाण्यातून देण्यात येऊ नये, असे कृषी विभागाने कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment