Search This Blog

Sunday, 13 August 2023

15 व 16 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन

 

15 व 16 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन

Ø पालकमंत्र्यांच्या हस्ते  महोत्सवाचे उद्घाटन

चंद्रपूरदि. 13 :   आपल्या आहारात विषमुक्त नैसर्गिक रानभाज्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. रानभाज्यांचे आरोग्य विषयक महत्व व माहितीजास्तीतजास्त  नागरिकांना होण्यासाठी व विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना  आर्थिक फायदा होण्याच्या दृष्टीने

दि. 15 ऑगस्ट 2023 रोजीसकाळी 11.30 वाजता कृषी भवनजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीचंद्रपूर कार्यालयाच्या परिसरात  रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

 मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश असतो. रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणाऱ्या रान पालेभाज्याफळभाज्याकंद भाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. तसेच रानभाज्या नैसर्गिकरीत्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशकबुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे रानभाज्या पुर्णपणे नैसर्गिक असल्याने त्यांचा आपल्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

रानभाजी महोत्सवात विविध पदार्थांचे प्रदर्शनविक्रीअवजारे व उपकरणांचे वाटप व सत्कार

रानभाजी महोत्सवात जिल्ह्यातील सर्व रानभाज्या व त्यापासून तयार केलेल्या विविध पदार्थांची प्रदर्शन व विक्रीप्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या जिल्हा संसाधन व्यक्तीचा सत्कारतसेच स्थापन झालेल्या उद्योगाच्या तसेच उद्योजकांचा विशेष सत्कारगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदानकृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना अवजारे व उपकरणे वाटप तसेच विभागामार्फत आयोजित पीक स्पर्धेत पारितोषिक प्राप्त पुरस्कार शेतकऱ्यांना पुरस्कार वाटप व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने विविध तृणधान्याच्या पाककलांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

तरीजास्तीतजास्त नागरीकांनी या रानभाजी महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment