Search This Blog

Monday 7 August 2023

9 ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालयात पंचप्रण शपथचे आयोजन

 9 ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालयात पंचप्रण शपथचे आयोजन

चंद्रपूर, दि. 7 : आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर शासनाने विविध कार्यक्रम हाती घेतले आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात मेरी मिट्टी मेरा देश (मिट्टी को नमन विरों को वंदन) अभियान राबविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत ऑगस्ट क्रांती दिनी म्हणजे 9 ऑगस्ट ला सकाळी 10 वाजता सर्व शासकीय कार्यालयात 'पंचप्रण शपथ' चे आयोजन करण्यात येणार आहे. 


याबाबत मार्गदर्शक सुचना पुढील प्रमाणे आहे.

सदर उपक्रमांचा भाग म्हणून सर्व नागरिकांना पंचप्रण शपथ घ्यावयाची असुन दिनांक 09 ऑगस्ट 2023 रोजी “ऑगस्ट क्रांती दिनांच्या” निमित्याने सकाळी 10.00 वाजता सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पंचप्रण शपथ घ्यावयाची आहे. तरी जिल्ह्यातील सर्व कार्यालयात खालील 

प्रमाणे सर्वांना पंचप्रण शपथ देण्यात यावी व त्या बाबतचे फोटो तालुका नोडल अधिकारी यांचे लॉगीन मधून  https://yuwa.gov.in/meri_matti_mera_desh या पोर्टलवर अपलोड करण्यात यावे, असे सर्व विभाग प्रमुखांना कळविण्यात आले आहे.

शपथ नमूना खालीलप्रमाणे आहे. : 

मी अशी शपथ घेतली आहे की,

1. भारताला विकसित देश बनवायचे आहे तसेच 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे.

2. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे.

3. देशाच्या समृध्द वारशाचा अभिमान बाळगायचा आहे.

4. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे.

5. नागरिकाचे कर्तव्य बजावयाचे आहे, तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे.

0000

No comments:

Post a Comment