Search This Blog

Wednesday 9 August 2023

14 व 16 ऑगस्ट रोजी सहकार विभागाच्या गट-क संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षा


14 व 16 ऑगस्ट रोजी सहकार विभागाच्या गट-क संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षा

चंद्रपूर, दि. 09 : सहकार विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता दि. 6 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरून विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस या कंपनीमार्फत सोमवार, दि. 14 ऑगस्ट व बुधवार, दि. 16 ऑगस्ट 2023 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना अर्ज सादर करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडीवर पाठविण्यात आले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करावयाची लिंक आणि याबाबतच्या सुचना सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या https://sahakarayukt.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

उमेदवारांनी वरील संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे आणि परीक्षेस येतांना त्याची रंगीत प्रत सोबत ठेवावी. प्रवेशपत्रात नमूद सुचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे, असे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment