नियोजित आरबी अर्बन क्रेडीट को. ऑप. सोसायटीबाबत हरकती असल्यास 28 ऑगस्टपुर्वी सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 14: नियोजित आरबी अर्बन क्रेडीट को. ऑप. सोसायटी लि. चंद्रपूरचा नोंदणी प्रस्ताव सहायक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयास प्राप्त झाला आहे. संस्थेच्या नोंदणी संबधांने चंद्रपूर तालुक्यातील नागरी/ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थाना काही हरकती असल्यास या कार्यालयास दि. 28 ऑगस्ट 2023 पुर्वी सादर करावे. तसेच दि. 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुनावणी ठेवण्यात आली आहे. हरकती असल्यास सुनावणीच्या वेळी दाखल कराव्यात.
कार्यालयास हरकती प्राप्त न झाल्यास किंवा सुनावणीला हजर न झाल्यास संबंधिताचे काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे सहकारी संस्थेचे सहायक निबंधक यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment