Search This Blog

Friday 18 August 2023

जात वैधता प्रमाणपत्राच्या त्रृटी पुर्ततेकरीता 22 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन

 जात वैधता प्रमाणपत्राच्या त्रृटी पुर्ततेकरीता 22 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 18 :  सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याकरीता ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज सादर केले आहेत, असे 14 ऑगस्ट 2023 पर्यंतचे संपूर्ण व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रकरणे तपासण्यात आली आहे. यापैकी वैध असलेल्या प्रकरणांचे ई-मेल संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेल वर पाठविण्यात आले आहेत.

मात्र ज्या प्रकरणांमध्ये त्रृटी आहेत, अशा प्रकरणांमध्ये त्रृटीबाबतचे ई-मेल पाठविण्यात आले आहे. तथापी 14 ऑगस्ट 2023 अखेर ज्या अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यांनी त्रृटी पुर्ततेकरीता 22 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण त्रृटी पुर्ततेसह/ मूळ कागदपत्रांसह कार्यालयात उपस्थित होऊन त्रृटीची पुर्तता करून घ्यावी. जेणेकरून अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही. व तसे झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहील, यासाठी समिती जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा जात प्रमाणपत्र तडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे यांनी कळविले आहे.

००००००००

No comments:

Post a Comment