तासिका तत्त्वावर शिल्प निदेशकांची रिक्त पदे भरण्याकरीता उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित
चंद्रपूर, दि. 21 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रह्मपुरी, नागभिड व सिंदेवाही तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आरमोरी जि. गडचिरोली येथे शैक्षणिक सत्र 2023-24 करीता निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावर शिल्प निदेशकांची पदे भरावयाची आहे.
यामध्ये विजतंत्री, जोडारी, संधांता, सुतारकाम, ड्रेस मेकींग, आय.सी.टी.एस.एम.(आय.एम.सी.), कोपा(आय.एम.सी.), गणित व चित्रकला निदेशक,एम्प्लॉयबिलीटी स्किल, यांत्रिक मोटारगाडी आदी व्यवसायाची पदे भरली जाणार आहेत. या पदाकरींता शैक्षणिक अर्हता संबंधित शाखेतील पदवी व 1 वर्ष अनुभव/ पदविका व 2 वर्ष अनुभव किंवा आय.टी.आय. व 3 वर्ष अनुभव आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.dvet.gov.in व www.dgt.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवारांनी मंगळवार, दि.29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर येथे प्रत्यक्ष मुलाखतीस स्वयंखर्चाने व मूळ प्रमाणपत्र तसेच झेरॉक्स संचासह उपस्थित रहावे. काही अडचण उद्भवल्यास प्र.प्राचार्य के. एन. रावळे-9403147784, प्र. गटनिदेशक व्ही. बी. वसाके-7507405731 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे ब्रह्मपुरी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. एम. डांगे यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment