Search This Blog

Sunday, 13 August 2023

14 ऑगस्ट रोजी वनमंत्र्यांच्या हस्ते मोहर्ली निसर्ग पर्यटन गेट सुशोभीकरण भूमिपूजन सोहळा

 

14 ऑगस्ट रोजी वनमंत्र्यांच्या हस्ते मोहर्ली  निसर्ग पर्यटन गेट सुशोभीकरण भूमिपूजन सोहळा

Ø  व्याघ्र गीताचे होणार लोकार्पण

चंद्रपूरदि. 13 : ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली निसर्ग पर्यटन गेट सुशोभीकरणाचे भूमिपूजन राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 14 ऑगस्ट रोजी दुपारी 12  वाजता मोहर्ली गेट येथे होणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पाला भेट देणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी जवळपास 50 ते 60 टक्के पर्यटक मोहर्ली गेट मधून व्याघ्र सफारीचा आनंद लुटतात. देश - विदेशातील येणाऱ्या पर्यटकांसाठी निसर्गाच्या पर्यटनासोबतच गेटचे सुशोभीकरण असणे आवश्यक आहे. याच उद्देशाने मोहर्ली निसर्ग पर्यटन गेट सुशोभीकरणाचे भूमिपूजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 14 ऑगस्ट रोजी होत आहे. या सुशोभीकरणाअंतर्गत पर्यटकांसाठी वातानुकूलित प्रतीक्षालयउपहारगृहव्याघ्र प्रकल्पाची माहिती देणारे केंद्रभेटवस्तू विक्री केंद्रपार्किंग व्यवस्थातिकीट काउंटर आदींचा समावेश आहे.

व्याघ्र गीताचे लोकार्पण : ताडोबा -  अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्याव्याघ्र गीताचे (मराठी रूप) लोकार्पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. या गीताची संकल्पना टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपची असून सदर गीत तनवीर गाजी यांनी लिहिले आहे. तर त्याला शंतनू मोइत्रा यांनी संगीतबद्ध केले आहे. या गीतासाठी छायाचित्रणप्रसिद्ध दिग्दर्शक नल्ला मुथ्थू यांनी काढले आहे. विशेष म्हणजे या गीताचे सर्व शूटिंग ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात झाल्याचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment