Search This Blog

Tuesday 1 August 2023

क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी विनय गौडा



क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपूर, दि. 01:  जिल्हा क्रीडा परिषदेची आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली वीस कलमी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तर स्पर्धेचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळा व महाविद्यालयांनी 100 टक्के क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. त्यासोबतच, जिल्ह्यात होणाऱ्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धेची तयारी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आतापासूनच सुरू करावी असे निर्देशही दिले.

बैठकीला अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, मनपा उपायुक्त मंगेश खवले, सा.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, चंद्रपूर जिल्हा थलेटिक संघटनेचे सचिव सुरेश अडपेवार, उपशिक्षणाधिकारी निकिता ठाकरे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी कुंदन नायडू आदी उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा परिषदेच्या बैठकीमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी मागील वर्षी आयोजित झालेल्या स्पर्धेच्या अहवालासह, शालेय क्रीडा स्पर्धेचा तालुकास्तर व जिल्हा स्तरापर्यंतचा आढावा सादर केला. सन 2023-24 या सत्रात जिल्ह्यात क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, अंतर्गत राज्यस्तरीय शालेय 14, 17 व 19 वर्षातील मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्ह्याला दिले असल्याने या स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर (विसापूर) येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले.  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय शालेय 19 वर्षे आतील मुले, मुली मैदानी क्रीडा स्पर्धा चंद्रपूर येथे होण्याबाबत मागणी करण्यात आली असल्याने या दोन्ही स्पर्धेच्या आयोजनाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

राज्य व राष्ट्रीय स्पर्धेच्या भव्यदिव्य आयोजनाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी राज्यस्तर स्पर्धेकरीता रु. 50 लक्ष व राष्ट्रीय स्पर्धेकरीता  60 लक्ष रुपयाची मागणी नाविन्यपूर्ण योजनेतून केली आहे. जिल्ह्यात विविध सिमेंट, पॉवर कंपनी यांच्या सी.एस.आर निधीतून जिल्हा क्रीडा परिषदेमध्ये क्रीडा निधी गोळा करण्याबाबत प्रयत्न करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

०००००००

No comments:

Post a Comment