Search This Blog

Wednesday 21 February 2024

24 फेब्रुवारी रोजी “रन फॉर व्होट” मिनी मॅरेथॉनचे आयोजन

 लोकसभा निवडणूक-2024


24 फेब्रुवारी रोजी रन फॉर व्होट मिनी मॅरेथॉनचे आयोजन

Ø मतदार जागृतीमध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 21 : लोकसभा निवडणूक-2024 च्या पार्श्वभुमीवर, लोकशाही बळकटीकरणासाठी तसेच नागरिकांच्या उज्वल भवितव्यासाठी मतदार जागृती अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 24 फेब्रुवारी रोजी रन फॉर व्होट मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मिनी मॅरेथॉनमध्ये चंद्रपुरातील सर्व मतदार बंधू-भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

मिनी मॅरेथॉनला शनिवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता, चांदा क्लब ग्राउंड येथून सुरुवात होईल. या मॅरेथॉनमध्ये जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, उपविभागीय अधिकारी रणजीत यादव, तहसीलदार विजय पवार आदी सहभागी होतील.

असा असेल मॅरेथॉन मार्ग :

चांदा क्लब ग्राउंड - जटपुरा गेट - गिरणार चौक - जोड देऊळ - गांधी चौक - जटपुरा गेट - आंबेडकर कॉलेज व नंतर चांदा क्लब ग्राउंड येथे मॅरेथॉनचा समारोप होईल.

अधिक माहितीसाठी 9637197469, 9822449916, 8668258522 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment