Search This Blog

Monday 12 February 2024

28 फेब्रुवारी रोजी खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत शिबिराचे आयोजन

 

28 फेब्रुवारी रोजी खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत शिबिराचे आयोजन

Ø युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि.12: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती व लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी एक दिवसीय जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर बुधवार,दि.28 फेब्रुवारी 2024 रोजी भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी या शिबिरात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत 18 जुन 2019 च्या शासन निर्णयानुसार मधकेंद्र योजना (मधमाशापालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वित झाली आहे. या योजनेतंर्गत महिलायुवक-युवतीसुशिक्षित बेरोजगारआदिवासीज्येष्ठनागरीकअनुसूचित जाती-जमातीस्वातंत्र्य सैनिकस्वयंसेवी संस्थामहिला बचत गटस्वयंसहायता युवा गटशेतकरीशेतमजूरभुमीहीनपारंपारीक कारागीर आदी समाजातील सर्वच घटकांना या योजनेचा लाभ देय आहे.

याशिवायपंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमप्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना आदी योजनाही महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येतात. या शिबीरामध्ये कृषिवनविभागपंचायत समिती व इतर शासकीय कार्यालयाचा सहभाग असणार आहे. अधिक माहितीकरीता 9373287057/9322789232 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment