Search This Blog

Friday 23 February 2024

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 96 उमेदवारांची निवड

 

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 96 उमेदवारांची निवड

चंद्रपूर,दि.23 : जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर व मॉडल करिअर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 96 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरोरायेथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित  करण्यात आला. आनंद निकेतन महाविद्यालयचे प्राचार्य मृणाल काळे  हे उदघाटक म्हणून तर औदयोगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भालचंद्र रासेकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा तसेच आपल्या कौशल्याचा वापर रोजगार/स्वंयरोजगार मिळविण्यासाठी करावा तसेच उद्योजकांनी रोजगार उपलब्ध करून दयावायाबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी सुद्धा सर्वसमावेशक मार्गदर्शन केले. तसेच आपल्या कौशल्याचा वापर रोजगार मिळविण्यासाठी करावा. उमेदवारांनी नोकरीसाठी बाहेर जाण्याची मानसिकता ठेवावी याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला  व्ही-1 क्लीक सोल्युशनचंद्रपूरभारत पे प्रा.लि. चंद्रपूरनवकिसान बायोटेक प्रा.ली. नागपूर,  स्पंदन स्पुर्ती फायनन्स लि. चंद्रपुर जय महाराष्ट्र प्लेसमेंन्ट सर्व्हिसेस प्रा. लि. चंद्रपुर एल आय सी चंद्रपुर,  अशपा ग्लोबल सर्व्हिसेस प्रा.लि. इ. कंपन्यांचा सहभाग होता. सदर मेळाव्यात उमेदवार बहुसंख्येने उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यात  368 पेक्षा जास्त उमेदवार होते. त्यापैकी 96 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक मुकेश मुंजनकर  यांनी केले. संचालन विकास देशमुख व शीतल सुसतकर यांनी तर आभार श्री. खिरटकर यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे गजानन घोसेश्रीकांत किरनाकेमुकेश मुजनकर व औदयोगिक प्रशिक्षण संस्थावरोरा यांचे कर्मचारी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment