Search This Blog

Friday 9 February 2024

कुष्ठरोग व क्षयरोग बाबत रॅलीद्वारे जनजागृती


कुष्ठरोग व क्षयरोग बाबत रॅलीद्वारे जनजागृती

चंद्रपूर, दि. 08: 30 जानेवारी हा दिवस कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरा केला जातो. समाजामध्ये कुष्ठरोग बाबत जनजागृती व्हावी या दृष्टीने दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या पंधरवाड्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

बल्लारपूर शहरात महात्मा ज्योतिराव फुले महाविद्यालय, तालुका आरोग्य अधिकारी आणि ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शिक्षकांच्या सहाय्याने कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कलंक कुष्ठरोगाला मिटवुया, सन्मानाने स्वीकार करूया असे घोषवाक्य देत कुष्ठरोगाबाबत तसेच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत टी.बी. हारेगा, देश जितेगा असे घोषवाक्य देत शहरात प्रभात फेरी काढून क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली.

सदर जनजागृती अभियानात महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

00000

No comments:

Post a Comment