Search This Blog

Thursday 22 February 2024

बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश


 बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश

चंद्रपूर,दि.22 : शहरात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाला बालविवाह रोखण्यास यश प्राप्त झाले. बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती गडचिरोलीचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांनी चंद्रपूरचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांना दिली.

माहिती मिळताच जिल्हाधिकारी विनय गौडा, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन 1098, तसेच रामनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्यासमवेत समन्वय साधून तात्काळ घटनास्थळी जाऊन बालविवाह थांबविण्यात यश आले. बालविवाहास उपस्थित मंडळीना बालविवाह प्रतिबंध अधिनियम कायदा 2006, बाबत मार्गदर्शन करण्यात आले.  सदर बालिकेला 22 फेब्रुवारी 2024 रोजी बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात येणार आहे.

बालविवाह थांबविण्याकरीता जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, पोलीस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे, चाईल्ड हेल्पलाईनचे अंकुश उराडे, महिला पोलीस हवालदार मनीषा मोरया, पोलिस शिपाई रजनीकांथ उथावार, रुदय संस्थेचे नरेश म्याकलवार व प्रणाली इंदुरकर, किरण बोहरा आदी उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment