Search This Blog

Saturday 17 February 2024

शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्यावर आधारीत वेशभूषा स्पर्धा

  शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्यावर आधारीत वेशभूषा स्पर्धा

Ø शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मनपाचे आवाहन

Ø प्रत्येक शाळेला ३ निश्चित बक्षिसे

Ø उत्कृष्ट वेशभूषेला अँड्रॉइड टॅब,सायकल,ट्रॉली बॅग मिळणार बक्षीस

चंद्रपूर, 18 फेब्रुवारी : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करण्याच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्यावर आधारीत वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत शहरातील सर्व शासकीय व खाजगी शाळेतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. आकर्षक वेशभूषा करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली जाणार आहेत.   

     छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक दैदीप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वांनी ही शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे सांस्कृतिक विभागाचे निर्देश आहेत. त्यानुसार चंद्रपूर मनपाद्वारे सदर कार्यक्रमाचे नियोजन केले  जात आहे. 

      या स्पर्धेत शहरातील सर्व शाळांचे वर्ग 1 ते 10 चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सहभागी विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट वेशभूषा धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सहभागी प्रत्येक शाळेला स्कुल बॅगवॉटर बॉटलकंपास या स्वरूपाची 3 बक्षिसे सुद्धा दिली जाणार आहेत. अँड्रॉइड टॅबसायकलट्रॉली बॅग असे मोठ्या बक्षिसांचे स्वरूप असून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रोत्साहनपर बक्षीससुद्धा देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता गिरनार चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून उपस्थित राहायचे आहे.           

            राज्य शासनामार्फत दरवर्षी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात येते. या दिवसाचे औचित्य साधून या थोरपुरुषांचे ज्या ज्या ठिकाणी पुतळे/स्मारके आहेततेथे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावीअसे निर्देशही राज्य शासनाने दिले आहेतत्यामुळे यंदा शिवजयंती कार्यक्रमाचे स्वरूप मोठे असून यात सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सादर केले जाणार आहेत.

०००००

No comments:

Post a Comment