Search This Blog

Wednesday, 21 February 2024

24 फेब्रुवारी रोजी वनविभागाद्वारे रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

24 फेब्रुवारी रोजी वनविभागाद्वारे रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर, दि.21: वनविभागाद्वारे चंद्रपूर, वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी (वनअकादमी) येथे राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून दि.24 फेब्रुवारी 2024 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यामध्ये वनविभागाद्वारे उपलब्ध होणारे विविध प्रकारचे रोजगार, स्टॉलद्वारे प्रदर्शन तसेच अभ्यास व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तरी, या मेळाव्यात बेरोजगार महीला, पुरुष, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच इच्छूक व्यक्तींनी भेट द्यावी. वनविभागाद्वारे आयोजित रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे चंद्रपूरचे विभागिय वन अधिकारी प्रशांत खाडे यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment