Search This Blog

Friday 9 February 2024

14 फेब्रुवारी रोजी ‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळेचे आयोजन

 14 फेब्रुवारी रोजी ‘लिडकॉम आपल्या दारी’ कार्यशाळेचे आयोजन

चंद्रपूर,दि.08: संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत शासन आपल्या दारी या संकल्पनेतंर्गत ‘लिडकॉम आपल्या दारी’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. सदर कार्यशाळा बुधवार, दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन सभागृह, रय्यतवारी रोड, चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

चर्मकार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी ही कार्यशाळा असून या माध्यमातून चर्मकार बांधवांना महामंडळाच्या योजनांची माहिती देवून इच्छुक उमेदवारांकडून फार्म भरुन घेतले जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये एम.सी.ई.डी.मार्फत 25 हजार युवक-युवतींना निवासी व अनिवासी प्रशिक्षण द्यावयाचे आहे. त्याकरीता चर्मकार प्रवर्गातील युवक-युवतींची नोंदणी करण्यात येणार आहे.

तरी, जिल्ह्यातील युवक-युवतींनी व चर्मकार बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन कार्यशाळेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक कल्पना भंगाळे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment