Search This Blog

Monday 26 February 2024

अनाथ बालकांना आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्याकरीता अनाथ पंधरवाडा

 

अनाथ बालकांना आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्याकरीता अनाथ पंधरवाडा

Ø 23 फेब्रुवारी ते मार्च कालावधीत आयोजन

चंद्रपूरदि. 26: जिल्ह्यातील अनाथ बालकांना आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्याकरीता दि. 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीमध्ये अनाथ पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवाड्यामध्ये अनाथ बालकांना आधार कार्डरेशन कार्डजातीचा दाखलामहाराष्ट्र राज्याचे अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखलामतदान कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असून संपूर्ण राज्यात अनाथ पंधरवाडा राबविण्यात येत आहे.

जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत अनाथ प्रमाणपत्र देण्यात आलेल्या 158 बालकांना व जिल्ह्यातील इतर अनाथ मुलांना सदरील आवश्यक कागदपत्र मिळवून देण्याकरीता तालुकास्तरावर समर्पित कक्ष स्थापन करून 15 दिवस कार्यवाही करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल 6 मार्च 2024 पर्यंत सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सबंधितांना दिल्या.

विधानसभेमध्ये सन-2023 च्या हिवाळी अधिवेशनातील लक्षवेधी सूचना क्र. 1934 च्या चर्चेदरम्यान अनाथ बालकांचे विविध मागण्यासंदर्भात 5 फेब्रुवारी 2023 रोजी महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा सदस्य बच्चू कडू यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत अनाथ मुलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याबाबत अनाथ पंधरवाडा राबविण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या.

0000000

No comments:

Post a Comment