Search This Blog

Monday 26 February 2024

28 फेब्रुवारी रोजी विधी सेवा महाशिबिराचे आयोजन

 

28 फेब्रुवारी रोजी विधी सेवा महाशिबिराचे आयोजन

चंद्रपूर,दि.26 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्लीमहाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचंद्रपूर व तालुका विधी सेवा समितीगोंडपिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारदि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता दलित मित्र वि.तु.नागापुरे डी.एड कॉलेजगोंडपिपरी येथे विधी सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत विधी सल्ला व सहाय्य दिल्या जाणार असून सर्व शासकीय आणि निमशासकीय योजनांचे लाभ व त्यांची माहिती देण्यात येणार आहे.

महाशिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी एस. भीष्म यांच्या हस्ते होणार असून जिल्हाधिकारी विनय गौडामुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनपोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरीसर्वांनी  महाशिबिरास भेट देवून विविध योजनांची माहिती व लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment