Search This Blog

Friday, 23 February 2024

निवृत्ती वेतनधारकांनी पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करण्याचे आवाहन

 

निवृत्ती वेतनधारकांनी पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 23 : चंद्रपूर कोषागार कार्यालयांतर्गत बँकेद्वारे निवृत्तीवेतन घेणा-या वेतनधारकांनी पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करणे अनिवार्य आहे. ज्या निवृत्ती वेतनधारकांनी अजूनपर्यंत आपले पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडले नाही, अशा आयकर दात्याच्या खात्यामधून माहे फेब्रुवारीच्या वेतनातून 20 टक्के प्रमाणे आयकर वसूल करण्यात येईल. त्यामुळे सर्व निवृत्ती वेतनधारकांनी त्वरीत पॅन क्रमांक आधारशी लिंक करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी संजय पडीशाला यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment