Search This Blog

Friday, 23 February 2024

मंजुर असलेल्या वृध्द साहित्यिक कलावंतांनी माहिती सादर करण्याचे आवाहन

 मंजुर असलेल्या वृध्द साहित्यिक कलावंतांनी माहिती सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 23 : महाराष्ट्र राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यीक कलावंत योजनेअंतर्गत मानधन मंजूर असलेले चंद्रपूर जिल्हयातील वृध्द साहित्यिक कलावंताची माहिती संचालकसांस्कृतीक कार्य संचालनालयमुंबई यांच्याकडे सादर करावयाची आहे. तरी जिल्हयातील मंजुर असलेल्या वृध्द साहित्यिक कलावंतांनी त्यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकआधार कार्डसंपर्क क्रमांक ही माहिती तालुक्यातील पंचायत समिती किंवा समाज कल्याण विभागजिल्हा परिषदचंद्रपूर येथे दिनांक 26 फेब्रुवारी पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment