Search This Blog

Friday 9 February 2024

अनुसूचित जाती उद्योजकांसाठी मिटकॉन मार्फत निवासी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम

 

अनुसूचित जाती उद्योजकांसाठी मिटकॉन मार्फत निवासी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम

Ø प्लास्टिक ब्लो मोल्डींग व कॅड कॅम या विषयावर नि:शुल्क प्रशिक्षण

चंद्रपूर,दि.09 : मिटकॉन कन्सलटन्सी ॲन्ड इंजिनियरींग सर्व्हिसेस लिमीटेड, चंद्रपूर आणि उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील युवक-युवतींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेतंर्गत 45 दिवसीय निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम नि:शुल्क स्वरुपात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत प्लास्टिक ब्लो मोल्डींग व कॅड कॅम या विषयावर नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती अनुसूचित जातीच्या उमेदवारांना देण्यासाठी 12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता समाजकल्याण सभागृह, शासकीय दूध डेअरी समोर, जलनगर वॉर्ड, चंद्रपूर येथे एक दिवसीय उद्योजकता परिचय मेळावा तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीचे आयेाजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमात उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग उभारणी, विविध क्षेत्रातील उद्योगसंधी, उद्योगांना भेटी, उद्योग निवड प्रक्रिया, विक्री व व्यवस्थापन कौशल्य, उद्योगाला लागणारे विविध नोंदणी व परवाने या व्यतिरिक्त निधी उभारण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती या कार्यक्रमामध्ये दिली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी नोंदणीकरीता मिटकॉन कन्सल्टन्सी ॲन्ड इंजिनियरींग सर्व्हिसेस लिमीटेड चंद्रपूर द्वारा, जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, चंद्रपूर येथे संपर्क साधावा. तसेच मेळाव्याला येताना मुलाखतीकरीता कागदपत्रांची सत्यप्रत घेऊन येणे आवश्यक आहे. अधिक माहितीकरीता मुख्य प्रशिक्षक (मो.9822707848), कार्यक्रम समन्वयक लक्ष्मी खोब्रागडे (मो. 9309574045), गुणवंत वाटेकर (मो.7709291018) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन मिटकॉनचे संतोष लंके यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment