शाळा,अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणाची तपासणी होणार
827 ग्रामपंचायती पैकी कोणत्याही 10 ते 16 ग्रामपंचायतीची पाहणी
ssg18 या ॲपवर नोंदवा आपल्या प्रतिक्रिया
चंद्रपुर (प्रतिनिधी)दिनांक - 01/08/2018 देशात सर्व जिल्ह्याचे स्वच्छता विषयक गुणांकण ठरविण्यासाठी " स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2018" अंतर्गत दिनांक 1 ऑगष्ट ते 31 ऑगष्ट 2018 या कालावधीत सर्व्हेक्षण होणार आहे. शाळा,अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, यात्रा स्थळे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध सार्वजनिक ठिकाणे यांची पाहणी करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्यातील 10 ते 16 गावांना प्रत्येक्ष भेट देवुन सर्व्हेक्षण होणार आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2018 करीता सज्ज राहावे अशा सुचना जिल्हा परिषद चंद्रपुर अंतर्गत सर्व गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहे.
गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणांचे निरिक्षणे तसेच स्वच्छते विषयी ग्रामस्थ , ग्रामपंचायत पदाधिकारी यांची स्वच्छते बाबतची मते घेतली जाणार आहेत. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाच्या संकेंत स्थळावरील माहितीचा आधारही यासाठी घेण्यात येणार आहे.सर्व देशात हे सर्व्हेक्षण होणार असुन, सर्व्हेक्षणासाठी ग्रामपंचायतीची निवड नमुना निवड पध्दतीने सर्व्हेक्षण सस्थेकडुन केली जाणार आहे. राज्यातील 340 ते 544 ग्रामपंचायती मधुन सर्व्हेक्षाण होणार आहे. राज्यात 50 लाख ग्रामस्थांअकडुन प्रत्येक्ष व ऑनलाईन सहभाग घेतला जाणार आहे. गावस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छताग्रही,ग्रामपंचायत सदस्य,निगराणी समिती सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या,,आशा, आणी शिक्षक यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत.
स्वच्छता सर्व्हेक्षण ला 100 गुण
1)सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेचे निरीक्षण - 30 गुण ( शौचालय उपलब्धता - 5 गुण, शौचालय वापर - 5 गुण,कच-याचे व्यवस्थापन - 10 गुण, सांडपाणी व्यवस्थापन - 10 गुण)
2) नागरीक तसेच मुख्य व्यक्तींची स्वच्छतेबाबतीत मते व अभिप्राय - 35 गुण ( जाणीआव जागृती - 20 गुण,नागरिकांचे ऑनलाईन अभिप्राय - 5 गुण, प्रभावी व्यकतींचे अभिप्राय - 10 गुण)
3) स्वच्छता विषयक सद्यास्थिती - 35 गुण ( स्वच्छतेचे प्रमाण - 5 गुण, हागणदारी मुक्तीची टक्केवारी - 5 गुण, हागणदारी मुक्त पडताळणी - 10 गुण, फ़ोटो अपलोडींग - 5 गुण, नादुरुस्त शौचलय उपलब्धता - 10 गुण, ) अशा तीन भागात गांवांची तपासणी होणार असुन, जिल्ह्यातील सर्व कर्मचारी ,अधिकारी व सर्व ग्रामस्थांनी स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2018 विषयी जागृक राहुन याद्वारा चंद्रपुर जिल्ह्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याच्या दृष्टीने सर्व जनतेनी सहभागी व्हावे . व ग्रामीण भागात राहणारे याजिल्ह्यातील सर्व अधिकारी ,कर्मचारी, पदाधिकारी, महाविद्यालयीन तरुण तथा चंद्रपुर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरीक ज्यांच्या कडे ऍनरॉईड मोबाईल आहे, अशा सर्व लोकांनी आजच आपल्या मोबाईल मध्ये ssg18 हा ॲप डाऊनलोड करुन आपली प्रतिक्रिया जास्तीत जास्त जनतेनी नोंदवावी. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment