चंद्रपूर,दि.04 ऑगस्ट - महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूर यांच्या वतीने 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवक व युवतींसाठी उद्योजकतेला पुरक असे वातावरण निर्माण करून स्वत:चा व्यवसाय करण्याच्या उद्देशाने पशुधन व्यवसायावर आधारित शेळी पालन, दुग्धव्यावसाय व कुकूडपालनासंबंधित दोन हप्ते चालणा-या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
या प्रशिक्षणात शेडची रचना, व्यवसायाचे फायदे शेळी, गाय व कोंबड्यांच्या विविध जाती, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण व निगा राखने तसेच संरक्षक प्रतिबंधक उपाय त्यांचे संगोपन व व्यवस्थापन संतूलीत आहार, जिवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोगावरील उपाय यांच्या व्यतिरीक्त शासनाच्या अनुदानीत योजना, पशूधन कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी तसेच कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकासाबद्दल यशस्वी उद्योजक व विशेष तज्ञ आणि शासकीय अधिकारी वर्गाव्दारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रशिक्षण घेण्यास ईच्छूक उमेदवारांनी दिनांक 8 ऑगस्ट 2018 पर्यंत शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका तसेच पासपोर्ट फोटो सह आपला बायोडाटा “महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन दुसरा माळा, बसस्टॉप समोर चंद्रपूर” या कार्यालयात सादर करावे, असे प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूर यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment